जिल्हा स्त्री रुग्णालयातील अग्निशमन यंत्र कालबाह्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:10 AM2021-01-10T04:10:12+5:302021-01-10T04:10:12+5:30

कमी वजनाच्या बाळांसह, जन्मत:च आजार जडलेल्या ० ते २८ दिवसांच्या बाळांवर जिल्हा स्त्री रुग्णालयात एनआयसीयूमध्ये उपचार केला जातो. ३२ ...

District Women's Hospital fire extinguisher expired | जिल्हा स्त्री रुग्णालयातील अग्निशमन यंत्र कालबाह्य

जिल्हा स्त्री रुग्णालयातील अग्निशमन यंत्र कालबाह्य

Next

कमी वजनाच्या बाळांसह, जन्मत:च आजार जडलेल्या ० ते २८ दिवसांच्या बाळांवर जिल्हा स्त्री रुग्णालयात एनआयसीयूमध्ये उपचार केला जातो. ३२ रुग्णक्षमतेचे हे एनआयसीयू कक्ष आहे. तेथे सद्यस्थितीत २० नवजातांवर उपचार सुरू आहे. यामध्ये ८०० ग्रॅम ते दीड किलो वजनाच्या १० मुले व १० मुलींचा समावेश आहे. यातील १४ नवजातांचा जिल्हा स्त्री रुग्णालयातच जन्म झालेला असून, सहा नवजात बाळ आऊटबॉर्न म्हणजे बाहेरून उपचारार्थ आणलेले आहेत. यात एका मातेला मधुमेहचा आजार असल्याने त्यांच्या बाळादेखील मधुमेह झाल्याने त्याचेवरही उपचार सुरू आहे. एनआयसीयूमध्ये पाच डॉक्टर्स आणि सिस्टर्ससह इतर अशा आठ कर्मचारी २४ तीन पाळीत सेवेत असतात, अशी माहिती डॉ. नितीन बरडिया यांनी दिली. भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात नुकतीच घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने येथील एनआयसीयूची स्थिती जाणून घेण्याच्या उद्देशाने लोकमतने हे स्टिंग केले आहे.

बॉक्स

कर्मचाऱ्यांना अग्निशमन यंत्र हाताळण्याचे प्रशिक्षण

एनआयसीयूमध्ये अचानक आग लागल्यास किंवा शॉर्ट सर्किट झाल्याने काय उपाययोजना करावी, यासंदर्भात इनहाऊस २४ तास कर्तव्य बजावणाऱ्या सिस्टर्स व इतर कर्मचाऱ्यांना अग्निशमन यंत्र कशाप्रकारे हाताळावे याचे प्रशिक्षण देण्यात येत असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.

--

दोन वर्षांपूर्वी लागली होती आग

२२ एप्रिल रोजी जिल्हा स्त्री रुग्णालयात शॉर्ट सर्किटची घटना घडली होती. त्यावेळी २२ नवजात उपचारार्थ दाखल होते. अचानक उदभवलेल्या प्रसंगाला तेथील कार्यरत कर्मचाऱ्यांनी व्यवस्थित हाताळले होते. दरम्यान त्यांची तारांबळ उडाली होती. मात्र, बाळांना तात़डीने सुपरस्पेशालिटी, पीडीएमसी रुग्णालयात हलविल्यामुळे बाळ बचावले, तर एक बाळ दगावले होते.

--

पीडीएमसीच अत्याधुनिक सुविधांचे नियोजन

४७ एकराच्या परिसरात वसलेल्या डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय तथा रुग्णालयात नवजात बाळांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने दीड कोटी रुपय खर्च करून अत्याधुनिक फायर एक्झिकेशन (अग्निरोधक यंत्रणा) उभारण्यात आलेली आहे. त्याचे मेन्टेनन्स अमेय एजन्सी करते. पीडीएमसीमध्ये २४ बाळांच्या उपचार क्षमतेचे एनआयसीयूचे दोन कक्ष आहेत.३०० अग्रिनरोधक यत्र (स्मोक डिटेक्टर) लागलेले आहेत. एअर स्प्रिंकलर सिस्टिमने आगीवर नियंत्रण मिळवण्याची तरतूद केल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. अनिल देशमुख यांनी दिली.

कोट

अग्निरोधक यंत्राची मुदत संपण्यापूर्वीच कोटेशन केलेले आहे. लॉकडाऊनमुळे ते काम वेळेत होऊ शकले नाही. परंतु, आता एक-दोन दिवसांत नवीन यंत्र लागून जातील.

- विद्या वाठोडकर,

अधीक्षक, जिल्हा स्त्री रुग्णालय

Web Title: District Women's Hospital fire extinguisher expired

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.