नंदनवनात दिवाळीच्या सुटीची मौज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2022 10:38 PM2022-10-27T22:38:11+5:302022-10-27T22:38:42+5:30
दररोजच्या शहरी जीवनातील धकाधकीत जाणारा प्रत्येक दिवस त्यामध्ये वर्षभरापासून दिवाळीच्या सुटीची वाट पाहणारे कुटुंब पर्यटनस्थळी जाण्याचा बेत आखतात. शाळांना दहा दिवसांच्या सुट्या लागल्यामुळे विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा पर्यटनस्थळावरसुद्धा दररोज शेकडोच्या संख्येने पर्यटक भेटी देत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
चिखलदरा : विदर्भाच्या नंदनवन असलेल्या चिखलदरा पर्यटनस्थळावर दिवाळीच्या सुटीत पर्यटकांनी चांगली गर्दी केली आहे. त्यामुळे येथील विविध पॉईंटवर परिवारासह आनंद घेताना दिसून येत आहेदोन वर्षांच्या कोरोनाकाळानंतर देशभरातील पर्यटनस्थळ उघडण्यात आल्यानंतर पर्यटक येथे भेटी देत मोकळा श्वास घेत आहेत.
दररोजच्या शहरी जीवनातील धकाधकीत जाणारा प्रत्येक दिवस त्यामध्ये वर्षभरापासून दिवाळीच्या सुटीची वाट पाहणारे कुटुंब पर्यटनस्थळी जाण्याचा बेत आखतात. शाळांना दहा दिवसांच्या सुट्या लागल्यामुळे विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा पर्यटनस्थळावरसुद्धा दररोज शेकडोच्या संख्येने पर्यटक भेटी देत आहेत.
नजीकच्या मध्य प्रदेश राज्याच्या अनेक जिल्ह्यातून मेळघाटची सीमारेषा लागून असल्यामुळे त्यांच्यासह राज्यातील पर्यटक सुटीचा आनंद घेताना दिसून येत आहेत. रविवारपर्यंत आप्तस्वकीयांसमवेत कुटुंबेच्या कुटुंबे चिखलदरा पयर्यटनस्थळाला भेट देतील, असा विश्वास येथील फेरीवाल्यांनी व्यक्त केला. चिखलदऱ्यात वातावरणात गारठा वाढल्याने तेथील थंडी अनुभवण्यासाठी पर्यटक येत आहेत.
सायंकाळी ५ नंतर थंडी
हिरवे जंगल, झुळझुळ झरेगत आठवड्यापासून पावसाने परतीचा प्रवास केला. त्यामुळे मेळघाटातील निसर्ग सौंदर्य बहरले आहे. हिरवी शाल पांघरून असलेले जंगल डोंगरदऱ्यामध्ये झुळझुळ वाहणारे पाणी पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरले आहे. सायंकाळी ५ वाजता नंतर पोहोचणारी थंडी पडू लागली. त्यामुळे अंगात गरम कपडे स्थानिकांसह पर्यटन घालताना दिसून येतात.
पॉईंटवर गर्दी, बच्चे कंपनीची मौज
निसर्गरम्य पर्यटनस्थळावरील विविध पॉईंट, जंगल सफारी आदी ठिकाणी पर्यटक भेट देत असले तरी दिवाळीच्या सुटीत खास बच्चे कंपनीसाठी उंट हॉर्स रायडिंग, विविध खेळणे, वन उद्यान आदी ठिकाणी चिमुकले आनंद घेत आहेत. पर्यटकांच्या गर्दीने येथील अर्थकारणातसुद्धा भर पडली. एटीव्ही बाईकवर सुद्धा मोठ्या प्रमाणात बेरोजगारांना रोजगार मिळत आहे.