वकील संघाचे दिवाळी मिलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 09:56 PM2017-10-16T21:56:13+5:302017-10-16T21:56:32+5:30
जिल्हा वकील संघाचा गुरुवारी रात्री दिवाळी मिलन सोहळा थाटात पार पडला. यावेळी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती सुनील चक्रे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्हा वकील संघाचा गुरुवारी रात्री दिवाळी मिलन सोहळा थाटात पार पडला. यावेळी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती सुनील चक्रे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
अमरावतीत जिल्हा वकील संघाच्या दिवाळी मिलन कार्यक्रमाला संबोधताना चक्रे म्हणाले की, अमरावती येऊन मला जुने दिवस आठवले. न्यायालयाच्या नवीन इमारतीबाबत बोलताना ते म्हणाले की भव्य वास्तूच्या या इमारतीमुळे अमरावतीची शोभा वाढणार आहे. या इमारतीचे काम पूर्णत्वास जात असून केवळ उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. डिसेंबरअखेर इमारतीचे कामकाज पूर्ण झाल्यावर न्यायालयीन कामकाजालाही सुरुवात केली जाईल. त्या दिशेने प्रयत्न सुरू असल्याचे चक्रे म्हणाले. यावेळी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अनिल पानसरे, नागपूर खंडपीठाचे रजीस्टार मनोज शर्मा, न्या.मुरलीधर गिरटकर, जिल्हा वकील संघाच अध्यक्ष प्रशांत देशपांडे उपस्थित होते. प्रशांत देशपांडे यांनी कार्यक्रमाची रुपरेषा सांगत वकील संघाच्या संघटित विचारावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे संचालन सरकारी वकील परीक्षित गणोरकर, तर आभार वकील संघाचे सचिव प्रतीक पाटील यांनी केले. यावेळी न्या.एस.डी. चव्हाण, एस.डी.मोडक, अधिकारी चंद्रशेखर डोरले, मिलिंद जोशी, मिलिंद वैष्णव, दिलीप तिवारी, प्रकाश चितलांगे, वासुदेव नवलानी, वसीम मिर्झा, अनिल कडू, शिरीष जाखड, दिप मिश्रा, देवेंद्र उपाध्याय, श्रेयश वैष्णव, शैलैश तिवारी, उमेश इंगले, दिपक सरदार, शदर सुर्यवंशी, सतीश वरघट, शशिकांत गवई, चंदन शर्मा आदी उपस्थित होते.