दिवाळी आटोपली; चाकरमान्यांना परतीचे वेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2018 10:31 PM2018-11-11T22:31:11+5:302018-11-11T22:32:12+5:30

दिवाळी उत्सव घरी आप्तस्वकीयांसह साजरा केल्यानंतर पुणे-मुंबईकडे कामाला असलेल्या चाकरमान्यांना परतीचे वेध लागले आहेत. दिवाळीनंतरच्या पहिल्या सोमवारी कर्तव्यावर रुजू व्हावयाचे असल्याने अमरावतीतून पुणे, मुंबईकडे जाणाऱ्यांची प्रचंड गर्दी दिसून आली.

Diwali is over; Back cover | दिवाळी आटोपली; चाकरमान्यांना परतीचे वेध

दिवाळी आटोपली; चाकरमान्यांना परतीचे वेध

Next
ठळक मुद्देकर्तव्यावर रुजू होण्याची घाई : रेल्वे, खासगी बसद्वारे प्रवासाला पसंती; पुणे, मुंबईचे तिकीट ‘हाऊसफुल्ल’

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : दिवाळी उत्सव घरी आप्तस्वकीयांसह साजरा केल्यानंतर पुणे-मुंबईकडे कामाला असलेल्या चाकरमान्यांना परतीचे वेध लागले आहेत. दिवाळीनंतरच्या पहिल्या सोमवारी कर्तव्यावर रुजू व्हावयाचे असल्याने अमरावतीतून पुणे, मुंबईकडे जाणाऱ्यांची प्रचंड गर्दी दिसून आली. मात्र, ११ नोव्हेंबर रोजी रेल्वे, खासगी बसचे आरक्षण मिळाले नाही. त्यामुळे काहींनी ‘वेटिंग’वर प्रवासाला नाखुषीने पसंती दिली.
नोकरी, व्यवसाय, उद्योगधंदे, रोजगारासाठी बाहेरगावी असलेले अमरावतीकर दरवर्षी दिवाळीत घर गाठतात. दोन-चार दिवस कुटुंबीयांसह दिवाळीचा उत्सव साजरा केल्यानंतर पुन्हा कर्तव्यावर जाण्याचे वेध त्यांना लागले होते. त्यामुळे रविवारी बहुतांश लोकांनी परतीचा प्रवास सुरू केला.
दरम्यान, यंदा दिवाळीत रेल्वे गाड्या ३० नोव्हेंबरपर्यंत हाऊसफुल्ल आहेत. मुंबई, पुणे, औरंगाबाद, सोलापूर या ठिकाणी जाण्यासाठी रेल्वेचे आरक्षण उपलब्ध नाही. त्यामुळे अनेकांनी आरक्षण मिळाले नसले तरी ‘वेटिंग’ तिकीट घेऊनच प्रवास केल्याची माहिती आहे. रविवारी नागपूर येथून मुंबई, पुणे मार्गे जाणाºया सायंकाळच्या ट्रॅव्हर्ल्स हाऊसफुल्ल होत्या. एकही सीट रिकामी नव्हती, असे एका खासगी बस संचालकाने सांगितले. सण-उत्सवाच्या काळात महिनाभरापासूनच मुंबई-पुण्याचे रेल्वे, बसचे बूकिंग होते. त्यामुळे अनेकांनी जादा पैसे मोजण्याची तयारी दर्शविली असली तरी त्यांना तिकीट मिळाले नाही. अमरावती-मुंबई एक्स्प्रेस, गोंदिया- सीएसटी विदर्भ एक्स्प्रेसमध्ये रविवारी तुफान गर्दी होती. मुंबईमार्गे जाणाºया या दोन्ही गाड्यांच्या साधारण डब्यातही पाय ठेवायला जागा नव्हती. प्रत्येक प्रवाशाला कर्तव्यावर रुजू होण्याची घाई दिसून आली. नागपूर- पुणे गरीब रथ, हावडा-पुणे आझाद हिंद एक्स्प्रेसमध्येही तुफान गर्दी होती. रेल्वे आणि खासगी बसमध्ये चाकरमान्यांचीच गर्दी असल्याचे दिसून आले. दिवाळीसाठी ६ किंवा ७ नोव्हेंबर रोजी कसेबसे घर गाठले. त्यामुळे परतीचा प्रवास तूर्तास एकट्याने करीत काही कुटुंबप्रमुखांनी नोकरीवर रुजू होण्याकरिता बस स्थानक गाठले. शाळा-महाविद्यालयीन मुले असलेल्या कुटुंबांचा मात्र गर्दी झेलत प्रवास करण्याचा नाइलाज आहे.
रेल्वे गाड्या ३० पर्यंत हाऊसफुल्ल
मुंबई, पुणे मार्गे जाणाऱ्या सर्वच रेल्वे गाड्यांमध्ये ३० नोव्हेंबरपर्यंत आरक्षण नसल्याचे फलक झळकत आहेत. कोणत्याही रेल्वे गाडीचे आरक्षण स्टेटस बघितले, तर ‘नो रूम’ असे प्रकर्षाने दिसून येते. दिवाळीनंतर त्वरेने कर्तव्यावर रुजू व्हायचे असल्याने अनेकांनी रेल्वेऐवजी ट्रॅव्हल्सने प्रवासाला पसंती दिली. मात्र, खासगी बस संचालकांकडे पुणे, मुंबईकरिता बूकिंग फुल्ल असल्याचे फलक झळकले आहेत. त्यामुळे अनेकांना जादा पैसे मोजूनच परतीचा प्रवास करावा लागला.

दिवाळीसाठी घरी अमरावतीला येताना झालेला प्रवास थकवा देणारा होता. आता पुण्यात परत जाताना तीच कसरत करावी लागणार का, ही चिंता सतावत होती. सोमवारी परत जाणे निकडीचे होते. त्यामुळे पुणेकरिता रविवारी खासगी बससाठी दोन हजार रुपये मोजावे लागले.
- सुजित श्रृंगारे, सावंतवाडी, पुणे.

Web Title: Diwali is over; Back cover

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.