दिवाळीत प्रदूषण... :
By Admin | Published: November 13, 2015 12:30 AM2015-11-13T00:30:46+5:302015-11-13T00:30:46+5:30
प्रकाशोत्सव म्हणजे उत्साह आणि आनंदाची जणू पर्वणीच ! बुधवारी हा उत्सव देशभरात थाटात साजरा झाला. दीपमाळांची आरास डोळ्यांना सुखावून गेली.
दिवाळीत प्रदूषण... : प्रकाशोत्सव म्हणजे उत्साह आणि आनंदाची जणू पर्वणीच ! बुधवारी हा उत्सव देशभरात थाटात साजरा झाला. दीपमाळांची आरास डोळ्यांना सुखावून गेली. आकाशात नजर जाईल तिकडे झगमगणारे आकाशदिवे, रोषणाई आणि त्यात दिव्यांचा लखलखाट. दिवाळीचा थाट न्याराच होता. या उत्साहात भर टाकली ती नेत्रदीपक आतषबाजीने विविधरंगी फटाक्यांनी आसमंत झगमगून गेला. मात्र, या आतषबाजीने एकप्रकारची हानीही झाली. वायू प्रदूषणाने रस्ते असे झाकोळून गेले होते. ‘प्रदूषणमुक्त’ दिवाळीचा संकल्प कोठेही दिसून आला नाही.