डी.एल.एड. प्रथम वर्ष ऑनलाईन प्रवेशासाठी विशेष फेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:13 AM2020-12-24T04:13:49+5:302020-12-24T04:13:49+5:30
अमरावती : सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षाकरिता प्राथमिक शिक्षण पदविका अभ्यासक्रम (डीईएलइएड) प्रथम वर्षासाठी शासकीय कोट्यातील ऑनलाईन प्रवेशाच्या ...
अमरावती : सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षाकरिता प्राथमिक शिक्षण पदविका अभ्यासक्रम (डीईएलइएड) प्रथम वर्षासाठी शासकीय कोट्यातील ऑनलाईन प्रवेशाच्या एकूण तीन फेऱ्या घेण्यात आल्या आहेत. तथापि अद्याप शासकीय कोट्यातील जागा रिक्त असल्यामुळे सदर जागा ऑनलाईन विशेष फेरीच्या माध्यमातून भरण्याचे ठरविण्यात आले आहे. यासाठी प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांनी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र पुणे यांच्या www.maa.ac.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावे. याबाबत सविस्तर सूचना, प्रवेश नियमावली व अध्यापक विद्यालयनिहाय रिक्त जागा आदीबाबत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र पुणे यांच्या www.maa.ac.in या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध आहे.
अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी विद्यार्थी इयत्ता १२ वी खुला संवर्ग ४९.५० टक्के व खुला संवर्ग वगळून इतर संवर्ग ४४.५० टक्के गुणांसह उत्तीर्ण असावा २२ ते २६ डिसेंबर प्रवेश अर्ज ऑनलाईन भरण्याचा कालावधी असून २७ डिसेंबर पर्यंत पडताळणी अधिकाऱ्यांनी प्रमाणपत्रांची ऑनलाईन पडताळणी करणे तसेच विद्यार्थ्यांनी ऑनलाईन प्रवेशपत्र प्राप्त करावे.
यापूर्वी ज्यांनी अर्ज पूर्ण भरुन अप्रू करून घेतला आहे. परंतु प्रवेश घेतलेला नाही, असे विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात. ज्यांचा अर्ज अपूर्ण किंवा दुरुस्तीमध्ये आहे, तसेच नव्याने प्रवेश अर्ज भरून प्रवेश घेण्यास इच्छुक असलेले सर्व उमेदवार अर्ज भरू शकतात. अर्ज ऑनलाईन पध्दतीने अप्रु केल्याशिवाय उमेदवारांचा प्रवेश प्रक्रियेत समावेश होणार नाही. या प्रक्रियेत विद्यार्थ्याने स्वत:च्या लाॅगीनमधूनच प्रवेश घ्यावा. विद्यार्थ्यांनी अध्यापक विद्यालयाची निवड करून लगेचच प्रवेशपत्र स्वत:च्या ई मेल/ लागीनमधून प्रिंट घ्यावी व त्यानंतर अध्यापक विद्यालयात चार दिवसांच्या आत प्रत्यक्ष उपस्थित राहून प्रवेश घ्यावा लागणार आहे.