शिक्षक बॅंक संचालकपदाचा ज्ञानेश्र्वर घाटे यांचा राजीनामा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 04:12 AM2020-12-25T04:12:23+5:302020-12-25T04:12:23+5:30
अमरावती : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांचे स्वीय सहायक ज्ञानेश्र्वर घाटे यांनी गुरुवारी शिक्षक बॅंकेच्या संचालकपदाचा राजीनामा दिला. बॅंकेचे ...
अमरावती : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांचे स्वीय सहायक ज्ञानेश्र्वर घाटे यांनी गुरुवारी शिक्षक बॅंकेच्या संचालकपदाचा राजीनामा दिला. बॅंकेचे अध्यक्ष गोकुलदास राऊत यांनी हा राजीनामा स्वीकारला आहे.
जिल्हा परिषद अधिनस्थ शिक्षक बॅंकेत एकमात्र घाटे हे कर्मचारी प्रतिनिधी म्हणून निवडून गेले होते. संचालक पदाचा कारभार २३ नोव्हेंबर २०२० रोजी संपुष्टात आला आहे. हल्ली कोरोना संसर्गामुळे बॅंक संचालक मंडळाची बैठक ऑनलाईन होत आहे. ३१ डिसेंबरपर्यंत बॅंक संचालक मंडळाला मुदतवाढ मिळाली आहे. मात्र, घाटे यांच्या राजीनाम्यानंतर आता एकही कर्मचारी प्रतिनिधी म्हणून संचालक मंडळात नाही.
------------------------
गौरव लाहे यांचे सुयश (फोटो आहे)
अमरावती : येथील श्री शिवाजी शिक्षण महाविद्यालयातील बी.एड.चे विद्यार्थी गौरव लाहे यांनी नुकतेच संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या वुमेन स्टी सेंटरतर्फे आयोजित निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला आहे. ‘घर कामात पुरुषांचा सहभाग’ या विषयावर निबंध सादर केला हाेता.