श्रीक्षेत्र महिमापूरला ज्ञानेश्वरी प्रवचन सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:13 AM2021-02-11T04:13:48+5:302021-02-11T04:13:48+5:30
८७ वर्षांची परंपरा, १९३३ साली रामचंद्र महाराज ठाकरे यांच्याकडून प्रारंभ नांदगाव खंडेश्वर : तालुक्यातील श्रीक्षेत्र महिमापूर येथे ८७ वर्षांपासून ...
८७ वर्षांची परंपरा, १९३३ साली रामचंद्र महाराज ठाकरे यांच्याकडून प्रारंभ
नांदगाव खंडेश्वर : तालुक्यातील श्रीक्षेत्र महिमापूर येथे ८७ वर्षांपासून ज्ञानेश्वरी प्रवचन सोहळ्याची परंपरा आजतागायत सुरू आहे. मात्र, यंदा येथील यात्रा कोरोनामुळे रोडावली.
जंगलात हनुमंताचे हे मंदिर आहे. सन १९३३ पासून गुरुवर्य हभप रामचंद्र महाराज ठाकरे नागपूरकर यांनी तेथे २१ दिवसांच्या ज्ञानेश्वरी प्रवचनाच्या उपक्रमास सुरुवात केली होती. त्यांच्या निधनानंतर भाऊसाहेब वरोलीकर, अमृत महाराज कहाळे यांनी ही परंपरा सुरू ठेवली. सन १९९५ ला गणेशराव काकडे, ज्ञानेश्वरराव खेडकर, प्रल्हादराव बोदडे यांनी तेथे सोहळ्याचे आयोजन केले होते. बऱ्याच भाविकांनी या मंदिरात हजेरी लावली होती. वडाखालची यात्रा म्हणूनही नंतर पंचक्रोशीत प्रसिद्ध झाली.
हनुमंताचे येथील पुरातन मंदिर चांदी प्रकल्पाच्या पाण्याने वेढले गेल्याने, मारुतीरायाच्या मूर्तीची २०१२ ला बाजूस उंच टेकडीवर धरणाच्या काठावर मंदिर उभारून प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. या ज्ञानेश्वरी प्रवचन सोहळ्यात या क्षेत्राच्या आजूबाजूच्या गावात दर रविवारी विठ्ठलाचा नामजप व प्रवचन आयोजित केले जाते व त्याची समाप्ती महिमापूर येथे केले जाते. तालुक्यातील मुंडवाडा, पळसमंडळ, धर्मापूर, रोहना, गौरखेडा, खंडाळा, वाढोणा रामनाथ, पिंपळगाव निपाणी, पिंपरी बोदडे, शिरपूर, सावंगा, नांदसावंगी, धानोरा गुरव, कोदोरी मारूफ, वाघोली, जावरा, नांदगाव खंडेश्वर आदी गावांतील भाविकांची येथे हजेरी लाभली असते. नुकताच या ठिकाणी ज्ञानेश्वरी प्रवचन सोहळा पार पडला. त्यात शंकर महाराज झंझाट, हभप ज्ञानेश्वर महाराज इंगळे, सोपानकाका कुचे, पवन महाराज खोडे, नितीन महाराज मेणे, शंकर महाराज तिडके, मुरलीधर महाराज बोधडे, छत्रपती आप्पा केसरखाने, पुरुषोत्तम महाराज मोरे, भीमराव मोरे, ज्ञानेश्वर चौधरी, पुरुषोत्तम महाराज बोबडे, शिरूभाऊ खेडकर, हिंमतराव पाडर, सुशीम काकडे, ओंकारराव शेठे, मंगेश महाराज काळे, बबनराव इंगळे यांनी या सप्ताहात महत्त्वपूर्ण योगदान दिले.