‘अमृत’ची कामे तातडीने करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2018 10:36 PM2018-07-08T22:36:49+5:302018-07-08T22:37:12+5:30
महापालिका क्षेत्रात केंद्र ्रशासन पुरस्कृत अमृत अभियान अंतर्गत पाणीपुरवठा टप्पा-२ योजनेचे कार्य तातडीने पूर्ण करा, असे निर्देश राज्याच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव श्यामलाल गोयल यांनी मजीप्रा अधिकाऱ्यांना दिलेत. विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ उपाध्यक्ष तथा आ. सुनील देशमुख यांच्या पुढाकाराने ‘अमृत’च्या कामासंदर्भात रविवारी आढावा बैठक घेण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : महापालिका क्षेत्रात केंद्र ्रशासन पुरस्कृत अमृत अभियान अंतर्गत पाणीपुरवठा टप्पा-२ योजनेचे कार्य तातडीने पूर्ण करा, असे निर्देश राज्याच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव श्यामलाल गोयल यांनी मजीप्रा अधिकाऱ्यांना दिलेत. विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ उपाध्यक्ष तथा आ. सुनील देशमुख यांच्या पुढाकाराने ‘अमृत’च्या कामासंदर्भात रविवारी आढावा बैठक घेण्यात आली.
श्यामलाल गोयल यांनी पाणीपुरवठा योजनेची कामे तातडीने पूर्ण न करणाºया कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्याचे निर्देश यंत्रणेला दिले. अमरावती शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी नेरपिगळाई ते अमरावती या दरम्यान २९ वर्ष जुनी पी.पी.सी सिमेंन्ट कॉक्रीटची बदलून नवीन वाहिनीकरीता अंदाजे २०० कोटींचे अंदाजपत्रक मजीप्राने शासनाला पाठविल्याचे आ. सुनील देशमुख यांच्या निदर्शनास आणून दिले. त्याबाबत प्रशासकीय कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश आ. देशमुख यांनी दिले.
अमरावतीकरांना कृत्रिम पाणी टंचाईला सामोरे जावे लागत असून, ही बाब अतिशय गंभीर असून, मजीप्राचे अपयश अधोरेखित करणारे असल्याचे निक्षून त्यांनी सांगितले. बैठकीला चंद्रकांत गजभिये, चारथळ, सुरेंद्र कोपुलवार, श्वेता बॅनर्जी, म्हसकरे, किशोर रघुवंशी, जितेंन्द्र गजभिये यासह शाखा अभियंते व कंत्राटदाराचे प्रतिनिधी उपस्थित होते.