अधिकारी ऐकत नाहीत ? पत्र पाठवा, पहा चमत्कार

By admin | Published: August 30, 2015 12:06 AM2015-08-30T00:06:35+5:302015-08-30T00:06:35+5:30

शासनाच्या अनेक महत्त्वपूर्ण योजना नागरिकांच्या कल्याणासाठी आहेत. ही योजना राबविण्यामध्ये अधिकाऱ्यांचा महत्त्वाचा वाटा असतो.

Do not the authorities listen? Send letters, see miracles | अधिकारी ऐकत नाहीत ? पत्र पाठवा, पहा चमत्कार

अधिकारी ऐकत नाहीत ? पत्र पाठवा, पहा चमत्कार

Next

पालकमंत्र्यांचे आवाहन : दर्यापुरात महाराजस्व अभियानचे उद्घाटन
दर्यापूर : शासनाच्या अनेक महत्त्वपूर्ण योजना नागरिकांच्या कल्याणासाठी आहेत. ही योजना राबविण्यामध्ये अधिकाऱ्यांचा महत्त्वाचा वाटा असतो. परंतु कामचुकार अधिकाऱ्यांमुळे नागरिकांचे प्रश्न मार्गी लागत नाही. शासनाचा अधिकारी जर काम करीत नसेल तर मला फक्त एक पत्र पाठवा आणि मग पहा चमत्कार, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी केले. दर्यापूर येथे आयोजित महाराजस्व अभियानाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर आ. प्रकाश भारसाकळे व पालकमंत्र्यांमध्ये जुगलबंदी झाली.
शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेंतर्गत सिंचनासाठी महत्वपूर्ण योगदान शेतकऱ्यांचे असून २४२ टीएमसी एवढी क्षमता असलेले धरणाचे पाणी वाढविले आहे. परंतु गेल्या एक वर्षापासून भाजपा-शिवसेनेच्या सरकारने महत्वपूर्ण निर्णय घेऊन हा प्रकार बंद झाला. ६६ वर्षात जेवढे निर्णय झाले नाहीत, त्यापेक्षा जास्त निर्णय शासन युद्धपातळीवर घेत असल्याचे पालकमंत्री पोटे यांनी सांगितले. अध्यक्षस्थानी आमदार रमेश बुंदेले होते. प्रमुख अतिथी आ. प्रकाश भारसाकळे, जिल्हाधिकारी किरण गित्ते, उपविभागीय अधिकारी इब्राहीम चौधरी, सभापती रेखा वाकपांजर, अरूणा गावंडे, योगेश्री चव्हाण, राजेंद्र राहाटे, वंदना राजगुरे, सुनील पाटील, तहसीलदार राहूल तायडे, बाळासाहेब हिंगणीकर, गिरीधर बोरखडे, अंजनगावचे तहसीलदार प्रदीप पवार उपस्थित होते. प्रास्ताविक इब्राहीम चौधरी, संचालन वैशाली घोगरे व आभार राहुल तायडे यांनी मानले.
पालकमंत्री म्हणतात, भारसाकळे दर्यापूरचे रत्न
मी दर्यापूर तालुका हा नवरत्नांची खाण असल्याचे ऐकले आहे. त्यापैकी आमदार प्रकाश भारसाकळे हे नवरत्नांपैकी एक रत्न असून अनेक आठ रत्न आहे. भाऊ तुमच्या रूपात दर्यापूर व आकोटला आमदाराचा मान मिळाला. त्यामुळे विकासाची गंगा तालुक्यात वाहत असल्याचे त्यांनी सांगितले.
दर्यापूरकडे लक्ष, माझ्याकडे दुर्लक्ष
आपल्या विनोदी शैलीत आमदार प्रकाश भारसाकळे यांनी पालकमंत्री प्रवीण पोटे यांचे माझ्याकडे दुर्लक्ष असले तरी दर्यापूर तालुक्याकडे मात्र कटाक्षपणे लक्ष असल्याची कबुली दिली. सार्वजनिक बांधकाम विभागाचे नवीन ठिकाणी इमारत बांधणे हे माझे स्वप्न असून निधीसाठी आपल्या खात्यातून पाठपुरावा करावा, असेही ते म्हणाले. भारसाकळे यांनी पालकमंत्र्यांबाबत ‘पाहुणा’ हा शब्द उच्चारताच मी पाहुणा कुठे आहे, असे पालकमंत्री म्हणाले.
जिल्हाधिकाऱ्यांचीही घेतली फिरकी
कार्यक्रमाला उपस्थित जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्याबाबत बोलताना आमदार प्रकाश भारसाकळे यांनी त्यांचीही फिरकी घेतली. गित्ते साहेबांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन अनेक ठिकाणी अतिक्रमण वाढले असल्याने ते निर्मूलन करण्यासाठी पाऊले उचलण्याची गरज असल्याचे सांगितले.

Web Title: Do not the authorities listen? Send letters, see miracles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.