फळाची अपेक्षा नको, निष्ठेने काम करा
By admin | Published: February 12, 2017 12:06 AM2017-02-12T00:06:47+5:302017-02-12T00:06:47+5:30
इमानदारी व निष्ठेने काम करा, फळाची अपेक्षा करू नका, आम्ही त्याचा अनुभव घेतला.
प्रकाश आमटे : लोकसहभागातून इमारतीचे लोकार्पण
नांदगाव खंडेश्वर : इमानदारी व निष्ठेने काम करा, फळाची अपेक्षा करू नका, आम्ही त्याचा अनुभव घेतला. एकमेकांना मदत करणे व निरपेक्ष सेवा करणे यानेच सद्भाव निर्माण होतो, असे प्रतिपादन प्रकाश आमटे यांनी केले.
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मंगरूळ चव्हाळा येथे आदिवासी, फासेपारधी समाजातील चिमुकल्यांसाठी लोकसहभागातून उभारलेल्या 'प्रश्नचिन्ह' आश्रम शाळेच्या मैत्र मांदियाळी ज्ञानमंदिर इमारतीच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हाधिकारी किरण गित्ते, मंदा आमटे, शांतीवनचे दीपक नागरगोचे, अविनाश सावजी, दीपक काळे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक अजय किंगरे, संचालन स्वामीराज भिसे व आभार प्रदर्शन मतीन भोसले यांनी केले. कार्यक्रमाला राज्यातील सामाजिक क्षेत्रात कार्यरत मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती. (तालुका प्रतिनिधी)