प्रिस्क्रिप्शनशिवाय स्टेरॉईड देऊ नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:11 AM2021-05-23T04:11:54+5:302021-05-23T04:11:54+5:30

जिल्हाधिकारी, म्युकरमायकोसिस वाढतोय, स्टेरॉईडचा अतिवापर थांबवा अमरावती : कोरोनाबाधितांवरील उपचारांत अनावश्यक स्टेरॉईड टाळणे अत्यंत गरजेचे आहे. कोरोनावरील ...

Do not give steroids without a prescription | प्रिस्क्रिप्शनशिवाय स्टेरॉईड देऊ नका

प्रिस्क्रिप्शनशिवाय स्टेरॉईड देऊ नका

Next

जिल्हाधिकारी, म्युकरमायकोसिस वाढतोय, स्टेरॉईडचा अतिवापर थांबवा

अमरावती : कोरोनाबाधितांवरील उपचारांत अनावश्यक स्टेरॉईड टाळणे अत्यंत गरजेचे आहे. कोरोनावरील उपचारानंतर बरे झालेल्या व्यक्तींमध्ये म्युकरमायकोसिसचे रुग्ण वाढत असल्याने याबाबत अत्यंत खबरदारी पाळण्याची गरज आरोग्यतज्ज्ञांनी व्यक्त केली.

स्टेरॉईडच्या संतुलित वापराबाबत सर्व रुग्णालयांना सूचना दिल्या जातील व औषध दुकानदारांनीही प्रिस्क्रिप्शनशिवाय स्टेरॉईड देऊ नयेत, तसेच अन्न व औषध प्रशासनाने याबाबत संनियंत्रण ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिले.

कोरोनापश्चात रुग्णांमध्ये म्युकरमायकोसिस आजार आढळल्याच्या पार्श्वभूमीवर वैद्यक क्षेत्रातील मान्यवर तज्ज्ञांची बैठक जिल्हाधिकारी नवाल यांनी घेतली. त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिलेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत काळी बुरशी आजाराचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून आले. कोरोनाबाधितांची उपचारादरम्यान कमी झालेली प्रतिकारशक्ती, बाधित रुग्णांना दिले जाणारे अति स्टेरॉईडस्, औषधे याला कारणीभूत ठरू शकतात. बाधितांची रोगप्रतिकारशक्ती कमी झालेली असते. रोगप्रतिकारशक्ती कमी असेल तर संसर्गाला सायनसमध्ये शिरण्यासाठी वाव मिळतो. त्यामुळे आजार होतो. रुग्णाला मध्यम व गंभीर लक्षणे नसतील स्टेरॉईड दिले जाऊ नये. रुग्णाची मधुमेहाची पातळीही पाहणे गरजेचे आहे, असे मत विविध तज्ज्ञांनी व्यक्त केले.

उपचार करताना स्टेरॉईडचा अनावश्यक वापर टाळावा. जिथे आवश्यकता म्हणून तसे उपचार केले असतील, तिथे रुग्णांना वेळीच माहिती देणे, त्यावर देखरेख ठेवणे हेही आवश्यक आहे. स्टेरॉईडचा अनियंत्रित वापर रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने संनियंत्रण करावे. औषध विक्रेत्यांनीही डॉक्टरांचे प्रिस्किप्शन असल्याशिवाय स्टेरॉईड देऊ नये, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले.

Web Title: Do not give steroids without a prescription

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.