प्रकल्पग्रस्तांचे अर्ज प्रलंबित ठेवू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2021 05:00 AM2021-10-23T05:00:00+5:302021-10-23T05:00:57+5:30

 प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्या प्रकल्पग्रस्तांना पुनर्वसित गावांत नागरी सुविधा उपलब्ध करुन देण्याचे काम जलसंपदा विभागाचे आहे. सामदा, सौंदडी प्रकल्पातील संपादित करावयाच्या जमिनीची मोजणी बाकी आहे. ती पूर्ण करावी. सध्या जलाशयात जलसाठा असल्यामुळे पाण्याच्या तरंग लहरीमुळे बुडीत क्षेत्राशेजारील काही शेतात पाणी साचल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यात. यावर तात्काळ कार्यवाही करण्याची सूचना त्यांनी संबंधितांना दिली. 

Do not keep project affected applications pending | प्रकल्पग्रस्तांचे अर्ज प्रलंबित ठेवू नका

प्रकल्पग्रस्तांचे अर्ज प्रलंबित ठेवू नका

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : विभागातील विविध सिंचन प्रकल्पांची निर्मिती होत असताना अनेकांच्या जमिनी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. शेतकरी, गावकरी बांधवांनी जमिनी दिल्या म्हणूनच प्रकल्प पूर्णत्वास आले आहेत. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांना योग्य मोबदला देऊन व त्यांच्या तक्रारींचे समन्वयाने निराकरण करून त्यांचा एकही अर्ज प्रलंबित राहता कामा नये, असे सुस्पष्ट आदेश जलसंपदा राज्यमंत्री  बच्चू कडू यांनी शुक्रवारी दिले. 
सिंचनभवन येथे विविध सिंचन प्रकल्पांसंदर्भात राज्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी आमदार प्रताप अडसड, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता (विशेष प्रकल्प)  अभय पाठक,  मुख्य अभियंता अनिल बहादुरे, अधीक्षक अभियंता रश्मी देशमुख,  अधीक्षक अभियंता आशिष देवघडे, पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता सु.गो. राठी यांच्यासह प्रकल्पांचे कार्यकारी अभियंता, अधिकारी उपस्थित होते.
 प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्या प्रकल्पग्रस्तांना पुनर्वसित गावांत नागरी सुविधा उपलब्ध करुन देण्याचे काम जलसंपदा विभागाचे आहे. सामदा, सौंदडी प्रकल्पातील संपादित करावयाच्या जमिनीची मोजणी बाकी आहे. ती पूर्ण करावी. सध्या जलाशयात जलसाठा असल्यामुळे पाण्याच्या तरंग लहरीमुळे बुडीत क्षेत्राशेजारील काही शेतात पाणी साचल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यात. यावर तात्काळ कार्यवाही करण्याची सूचना त्यांनी संबंधितांना दिली. 
शहानूर धरणातून  त्यांच्या निवेदनाच्या अनुषंगाने सन २००४  पूर्वीचा रहिवासी पुरावे तपासून वाढीव मोबदला व अतिक्रमण नियमानुकूल प्रकरणांचा निपटारा लवकरात लवकर करण्यात यावेत, असेही ते म्हणाले.
प्रकल्पातून विसर्ग होणाऱ्या पाण्यामुळे प्रकल्पालगतच्या शेतीचे नुकसान झाल्याने भरपाई मिळण्यासाठीचे निवेदन शेतकऱ्यांनी सादर केले. त्यावर त्यांना योग्य मोबदला मिळावा, यासाठी बाधित क्षेत्राची महसूल व कृषी विभागाव्दारे संयुक्त तपासणी करून योग्य नुकसान भरपाईची कार्यवाही गतीने पूर्ण करावी, असेही राज्यमंत्र्यांनी सांगितले. 
शहानूर नदीपात्रातील सिमेंट बंधाऱ्याचे बांधकाम, अंजनगाव तालुक्यातील भुलेश्वरी नदी प्रवाह मार्गातील बंधारा बांधकाम, सोनगाव शिवणी शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी रस्ता बांधकाम, अप्पर वर्धा धरणग्रस्तांच्या तसेच विविध प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांचा सविस्तर आढावा घेऊन राज्यमंत्र्यांनी संबंधितांना पुढील कार्यवाही तात्काळ करण्याचे आदेश दिले.

 

Web Title: Do not keep project affected applications pending

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.