अनुदानातून कृषिकर्जाची वसुली करू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:13 AM2021-05-27T04:13:27+5:302021-05-27T04:13:27+5:30
धामणगाव रेल्वे : कोरोनाबाधित शेतकऱ्यांच्या जिवाची तगमग होत असताना, त्यांना मिळणाऱ्या अनुदान योजनेच्या रकमेतून बँका सक्तीची वसुली करीत ...
धामणगाव रेल्वे : कोरोनाबाधित शेतकऱ्यांच्या जिवाची तगमग होत असताना, त्यांना मिळणाऱ्या अनुदान योजनेच्या रकमेतून बँका सक्तीची वसुली करीत आहेत. यामुळे त्यांच्यापुढे मोठे संकट उभे ठाकले आहे. त्यामुळे बँकांनी अनुदानाच्या रकमेतून वसुली करू नये, असे पत्र जिल्हा प्रशासन व बँकांना आमदार प्रताप अडसड यांनी दिले आहे.
प्रधानमंत्री किसान सन्मान योजना, विमा योजना, पंतप्रधान आवास योजना अशा योजनांचे अनुदान त्यांच्या बँक खात्यात जमा होते; परंतु त्यांचा लाभ त्यांना मिळत नाही. कारण काही बँका शेतकऱ्याला न कळवताच अनुदानाची असलेली रक्कम परस्पर कर्ज खात्यात वळती करीत आहेत. यामुळे कोणत्याही कर्जधारक शेतकऱ्याचे कर्ज अनुदानातून वसुली करू नका, अशी मागणी धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रताप अडसड यांनी केली आहे.