जिल्हा परिषदेत नादानांच्या हाती सत्ता देऊ नका
By admin | Published: February 11, 2017 12:03 AM2017-02-11T00:03:57+5:302017-02-11T00:03:57+5:30
ग्रामीण विकासाचा कणा असलेली जिल्हा परिषद नादानांच्या हाती देऊ नका, .
मुख्यमंत्री : मंडळनिहाय हवामान केंद्र, जिल्हा परिषदेतून खरेदी बंद, लाभार्थ्यांना थेट अनुदान
आसेगाव पूर्णा/ परतवाडा : ग्रामीण विकासाचा कणा असलेली जिल्हा परिषद नादानांच्या हाती देऊ नका, राज्य शासनाने कोट्यवधी रुपयांचा निधी देऊनसुद्धा लाभार्थ्यांना त्याचा लाभ न देणारे कुठला विकास करतील? नजीकच्या कंत्राटदारांना लाभ देण्यासाठी वाट्टेल तशी खरेदी करण्याचा प्रकार आता बंद करण्यात आला आहे. लाभार्थ्यांना थेट अनुदान देण्यात येणार असल्याने भाजपला एक हाती सत्ता देण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ते आसेगावपूर्णा येथे जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारार्थ शुक्रवारी येथे आले असता हजारोंच्या उपस्थित जनसमुदाय उपस्थित होता.
यावेळी मंचावर पालकमंत्री प्रवीण पोटे, आ. अनिल बोंडे, अरुण अडसड, दिनेश सूर्यवंशी, गजानन कोल्हे, आ. रमेश बुंदीले, आ. प्रभुदास भिलावेकर, निवेदिता चौधरी, जयंत आमले, अशोकराव बनसोड, सूर्यकांत जैस्वाल, शशीकांत जैस्वाल, सह नगर पालिकांचे अध्यक्ष आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)