युवकांच्या डीपीवर ‘डू नॉट शेअर लोकेशन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2020 05:00 AM2020-05-03T05:00:00+5:302020-05-03T05:00:02+5:30

मेळघाट व्याघ्र प्रकल्पात ‘वाघ दाखवा - बक्षीस मिळवा’ अशी म्हण अनेक वर्षे प्रचलित झाली होती. परंतु, आता ती खोटी ठरू लागली आहे. पर्यटकांसह स्थानिकांनाही वाघोबाचे दर्शन होऊ लागले आहे. चिखलदरा शहरातील एका प्रेक्षणीय पॉइंटवर (लोकमतसुद्धा शिकाऱ्यांच्या भीतीने लोकेशन सांगणार नाही) शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता चालणाऱ्या गुराख्यांना वाघोबा दिसले. त्यांनी याची माहिती छायाचित्रकार विन्सेंट चंदामी यांना दिला. त्यांनी आपल्या कॅमेरात वाघाला कैद केले.

'Do not share location' on youth DP | युवकांच्या डीपीवर ‘डू नॉट शेअर लोकेशन’

युवकांच्या डीपीवर ‘डू नॉट शेअर लोकेशन’

Next
ठळक मुद्देविदर्भाच्या नंदनवनात वाघोबाचे दर्शन; शिकाऱ्यांच्या भीतीने उचलले सकारात्मक पाऊल

लोकमत न्यूज नेटवर्क
चिखलदरा : विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा पर्यटनस्थळावर शुक्रवारी सायंकाळी एका पॉईंटवर स्थानिकांना वाघोबाने दर्शन दिले. कॅमेरात वाघ कैदही झाला. ही सर्वांसह मेळघाट व्याघ्र प्रकल्पासाठी आनंदाची बाब असली तरी त्याहूनही महत्त्वपूर्ण म्हणजे, या वाघाचे लोकेशन कुठेच शेअर करू नका, अशा आशयाचा संदेश देणारे डीपी स्थानिक युवकांनी मोबाईलवर ठेवला. वाघ बचाव मोहिमेत युवकही सहभागी असल्याचा संदेश त्यांनी याद्वारे दिला आहे.
मेळघाट व्याघ्र प्रकल्पात ‘वाघ दाखवा - बक्षीस मिळवा’ अशी म्हण अनेक वर्षे प्रचलित झाली होती. परंतु, आता ती खोटी ठरू लागली आहे. पर्यटकांसह स्थानिकांनाही वाघोबाचे दर्शन होऊ लागले आहे. चिखलदरा शहरातील एका प्रेक्षणीय पॉइंटवर (लोकमतसुद्धा शिकाऱ्यांच्या भीतीने लोकेशन सांगणार नाही) शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता चालणाऱ्या गुराख्यांना वाघोबा दिसले. त्यांनी याची माहिती छायाचित्रकार विन्सेंट चंदामी यांना दिला. त्यांनी आपल्या कॅमेरात वाघाला कैद केले.
दरम्यान, ग्रुपवर सदर डीपी जास्तीत जास्त फॉरवर्ड करण्याची विनंतीही युवकांनी केली. यामध्ये अतुल वानखडे, अमर गवई, मोहम्मद साबिर, रोहित वानखडे, मोहम्मद जाबिर, स्वप्निल दामले, करण तायडे, प्रशांत गवई, सौरभ चावरे, शुभम गवई, रोहित वानखडे, शुभम देवळेकर, शुभम पतिंगे, रोशन गायकवाड, जावेद खान, भारत डोंगरे आदींनी यामध्ये सहभाग घेतला.

अन्यथा कारवाई
वाघ असेल, तर जंगल वाचेल आणि या वाघाला पाहण्यासाठीच पर्यटक येतील. त्यातून रोजगार मिळेल; नाही तर शिकारी पुन्हा वाघाची शिकार करतील. पर्यावरणाची ही साखळी जोडण्यासाठी संबंधित पॉइंटवर वाघ दिसल्याची चर्चा वाऱ्यासारखी पसरताच युवकांनी ‘मोबाईलच्या डीपीवर कृपया वाघाचे लोकेशन कोणालाच सांगू नका, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यास भाग पाडू’ अशा ओळी डीपीवर झळकविल्या.

पर्यटनस्थळावरील एका पॉईंटवर वाघ दिसल्यानंतर स्थानिक युवकांनी मोबाईलवर वाघाचे लोकेशन शेअर न करण्याचे ठेवलेले डीपी शासन-प्रशासन करीत असलेल्या कार्याची पावती आहे. हे प्रशंसनीय कार्य आहे
- पीयूषा जगताप, उपवनसंरक्षक मेळघाट वन्यजीव विभाग

Web Title: 'Do not share location' on youth DP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.