बिजप्रक्रीया करुनचं करा बियाण्याची पेरणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:10 AM2021-06-06T04:10:43+5:302021-06-06T04:10:43+5:30
शेंदोळा खुर्द : खरीप हंगामाला सुरुवात झाली आहे. या खरीप हंगामावरच शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून असते. खरीप हंगामामध्ये कापूस, सोयाबीन ...
शेंदोळा खुर्द : खरीप हंगामाला सुरुवात झाली आहे. या खरीप हंगामावरच शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून असते. खरीप हंगामामध्ये कापूस, सोयाबीन व तूर ही पिके प्रामुख्याने घेतली जातात. या बियाण्यांची बीजप्रक्रिया करणे खूप महत्त्वाचे असते. एखाद्या लहान बाळाचे लहाणपणीच लसीकरण केले जाते. त्यामुळे विविध आजारांपासून त्याचे संरक्षण केले जाते. त्याचप्रमाणे पिकावर येणारे रोग जे जमिनीच्या माध्यमातून, बियाण्यांपासून होतात, अशा रोगांपासून तसेच किडींपासून पिकाचे संरक्षण करण्यासाठी बीजप्रक्रिया महत्त्वाची असते. बीजप्रक्रियेमुळे जास्तीचा होणारा फवारणीचा खर्च कमी होऊ शकतो. बीजप्रक्रिया केल्यामुळे पिकाची निरोगी वाढ होऊन उत्पादनात वाढ होते. त्यामुळे बीजप्रक्रिया ही पिकाच्या पेरणीसाठी खूप महत्त्वाची आहे. बीजप्रक्रिया ही दोन पद्धतीने केली जाते. पहिली रासायनिक बीजप्रक्रिया व दुसरी जैविक बीजप्रक्रिया. यामध्ये प्रथम रासायनिक बीजप्रक्रिया करावी. त्यामध्ये बुरशीनाशकाची आधी बीजप्रक्रिया करावी. त्यानंतर कीटकनाशकाची बीजप्रक्रिया करावी. ही बीजप्रक्रिया पेरणीच्या आठ दिवसाअगोदरही करता येते. जैविक बीजप्रक्रिया ही पेरणीच्या दिवशी पेरणीपूर्व दोन तास आधी करावी. सोयाबीनची बीजप्रक्रिया करताना कार्बोक्झिम ३७.५ %, थायरम ३७.५ % या मिश्र बुरशीनाशकाची प्रतिकिलो बियाण्यास
===Photopath===
050621\img-20210602-wa0019.jpg~050621\img-20210602-wa0020.jpg
===Caption===
घोटा येथील शेतकरी पंकज राऊत यांच्या शेतावर बिजप्रक्रीयेचे प्रात्यक्षीक करुन दाखवितांनी एन एस जवंजाळ कृषि सहाय्यक~मौजा घोटा येथील शेतकरी पंकज राऊत याच्या शेतावर बिजप्रक्रीयेचे प्रात्यक्षीक करुन दाखवितांनी एन एस जवंजाळ