रस्ते तुम्ही खराब करता अन दुरूस्ती आम्ही करावी का
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:17 AM2021-09-04T04:17:53+5:302021-09-04T04:17:53+5:30
जिल्हा परिषद आमसभा;अधिकाऱ्यावर अध्यक्ष संतापले अमरावती: जिल्हा परिषदेच्या मालकीचे तसचे गत दोन वर्षापासून ग्रामीण भागातील रस्ते कुठलीही एनओसी न ...
जिल्हा परिषद आमसभा;अधिकाऱ्यावर अध्यक्ष संतापले
अमरावती: जिल्हा परिषदेच्या मालकीचे तसचे गत दोन वर्षापासून ग्रामीण भागातील रस्ते कुठलीही एनओसी न घेता वापरण्यात आले.यावर एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांनीदिलेली उडवाउडवीचे उत्तरे तसेच गत दोन वर्षापासून वैयक्तीक लाभाच्या योजनेचा लाभाचे अनुदान न दिल्याने या विषयांवर शुक्रवारी जिल्हा परिषद आमसभेत सदस्य चांगलेच आक्रमक झाले होते.अध्यक्ष बबलू देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सभेला प्रारंभ होत आहे. जिल्हा परिषदेच्या मालकीचे उखडलेल्या रस्त्याचा मुद्दा सदस्यांनी उपस्थित केला.जि.प.चे २६ रस्ते खराब झाले असून एमएसआरडीसी कडून बोटावर मोजण्या इतकेच रस्ते थातुर मातूर दुरूस्त केले.यावर अध्यक्ष बबलू देशमुख यांनी या विभागाने सभागृहात दिलेली माहिती यादी चुकीचे असल्याचे सांगत आमचे रस्ते विनापरवानगी खराब तुम्ही करायचे अन दुरूस्ती आम्ही करायची का असे खडेबोल सुनावत अधिकाऱ्याला चांगलेच सुनावले.
अंजनगाव बारी परिसरात हायब्रीड इन्युटी अंतर्गत सुरू असलेल्या रस्ताची कामे अतिशय निकृष्ठ पध्दतीने करण्यात आल्याचा आरोप सदस्य दिनेश टेकाम यांनी केला.अतिभार वाहतुकीमुळे अमरावती जिल्ह्यातील अनेक गावांचे पोच रस्ते खराब केला असतांना संबंधित यंत्रणेकडून गावात येण्या जाण्याचे रस्तेही दुरूस्त केले नाहीत.यात ६७ लाख रूपयाचे रस्ते खराब झाले आहेत.विशेष म्हणजे जि.प. एनओसी घेतली नसतांना रस्ते वापरणाऱ्या यंत्रणेकडून तात्काळ दुरूस्त करून घ्यावे असे आदेश अध्यक्षांनी दिले आहेत. याशिवाय सभेत रोजगार हमी,शिक्षण,पाणी पुरवठा,कृषी आदी विभागाचेही प्रश्न गाजले. यावेळी सभेला उपाध्यक्ष विठ्ठल चव्हाण सभापती बाळासाहेब हिंगणीकर,दयाराम काळे,पुजा आमले,सदस्य प्रताप अभ्यंकर,रविंद्र मुंदे,नितीन गोंडाणे, वासंती मंगरोळे,महेंद्र गैलवार,शरद मोहाेड,दत्ता ढोमणे,गौरी देशमुख,सुहासिनी ढेपे,जयंत देशमुख आदीसह सीईओ तुकाराम टेकाळे,कॅफो चंद्रशेखर खंडारे,डेप्युटी सीईओ श्रीराम कुलकर्णी आदी उपस्थित होेत.
बॉक्स
कोरोना योध्दाना वेतन वाढ द्या
कोरोनाच्या संकटकाळात आराेग्य विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपला जिव धोक्यात टाकून रूग्ण सेवा दिली आहे.त्याचे कितीही सत्कार केल्याने समाधान होणार नाही.त्यामुळे त्याच्या कार्याची दखल घेत आरोग्य विभागातील कोरोना काळात काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना एक वेतनवाढ द्यावी असा प्रस्ताव सदस्य प्रताप अभ्यंकर यांनी सभागृहात मांडला.यावर अध्यक्ष बबलू देशमुख यांनी यावर ठराव पारीत करून शासनाकडे पाठविण्याचे आदेश दिले आहेत.
बॉक्स
बदलीप्रक्रियेत गोलमाल
महिला व बालकल्याण विभागातंर्गत अंगणवाडी पर्यवेक्षकांच्या बदली प्रक्रियेत अनियमिता झाल्याचा आरोप सदस्य प्रकाश साबळे यांनी केला आहे.आदिवासी क्षेत्रात झालेल््या बदली प्रक्रियेत मोठया प्रणात आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.