प्रियंका खून प्रकरण : पती पंकज दिवाणला अटक; 'सस्पेन्स' कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2022 12:46 PM2022-04-30T12:46:44+5:302022-04-30T12:53:53+5:30

प्रियंका दिवाण यांच्या खुनाचा गुन्हा दाखल झाल्याबरोबर तिन्ही आरोपी ‘नॉट रिचेबल’ झाले होते, पैकी डॉ. पंकज यांची बहीण अद्यापही फरार आहे.

doctor husband pankaj diwan arrested in Priyanka Diwan murder case | प्रियंका खून प्रकरण : पती पंकज दिवाणला अटक; 'सस्पेन्स' कायम

प्रियंका खून प्रकरण : पती पंकज दिवाणला अटक; 'सस्पेन्स' कायम

googlenewsNext
ठळक मुद्देपंकज दिवाणच्या आईला घेतले ताब्यातपळण्याच्या बेतात असताना गाडगेनगर पोलिसांचा 'ट्रॅप'

अमरावती : प्रियंका दिवाण (२७) यांच्या खुनाचा आरोप असलेला तिचा पती डॉ. पंकज दिवाण व त्यांच्या आईला शुक्रवारी सायंकाळी सिनेस्टाईल अटक करण्यात आली. पळण्याच्या बेतात असलेल्या दिवाण माय-लेकाला मोर्शी रोडहून अटक केल्याची माहिती गाडगेनगरचे ठाणेदार आसाराम चोरमले यांनी दिली. प्रियंका दिवाण यांच्या खुनाचा गुन्हा दाखल झाल्याबरोबर तिन्ही आरोपी ‘नॉट रिचेबल’ झाले होते, पैकी डॉ. पंकज यांची बहीण अद्यापही फरार आहे.

प्रियंका यांच्या मृत्यूप्रकरणी आठवडाभरानंतर खून, खुनाचा पुरावा नष्ट करणे, फौजदारी स्वरूपाचा कट रचणे व कौटुंबीक छळाचा गुन्हा नोंदविला गेला असला तरी प्रियंका हिचा खून नेमका कसा झाला, ते अद्यापही स्पष्ट झालेले नाही. त्यासाठी पोलिसांना डॉ. पंकजची, त्याच्या कबुली जबाबाची प्रतीक्षा आहे. त्याच्या अटकेनंतरच ते साध्य होणार होते. डॉ. पंकज व त्यांच्या आईला शनिवारी स्थानिक न्यायालयात हजर करण्यात येईल. त्यानंतरच प्रियंकाच्या खुनाचा नेमका उलगडा होऊ शकेल. गाडगेनगर पोलीस डॉ. पंकजच्या बहिणीचादेखील कसून शोध घेत आहेत.

प्रियंकाचा मोबाईलला पासवर्ड

प्रियंकाच्या मृत्यूची माहिती कळताच तिची प्राध्यापक असलेली धाकटी बहीण प्रगती ही श्री साई हेल्थकेअर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलला पोहोचली. तिने प्रियंकाचा मोबाईल पाहिला. मात्र, त्याला लॉक पासवर्ड असल्याने ती तो उघडू शकली नाही. मात्र, डॉ. पंकजला प्रियंकाच्या मोबाईलचा अनलॉक पासवर्ड माहीत असल्याने तो त्यातील महत्त्वाचा डेटा डिलिट करू शकतो, या भीतीने प्रगती हिने तो मोबाईल डॉ. पंकजकडे दिला नाही. तो २७ एप्रिलला गाडगेनगर पोलिसांना देण्यात आला. डॉ. पंकजच्या अटकेनंतर आता प्रियंकाच्या मोबाईलची तपासणी केली जाईल. मात्र, तो मोबाईल अनलाॅक न झाल्यास तो फॉरेन्सिक लॅबला पाठविला जाईल.

प्रियंका हिच्या खुनाप्रकरणी शुक्रवारी सायंकाळी डॉ. पंकज दिवाण व एका महिलेला अटक करण्यात आली. मोर्शी मार्गावरून त्यांना पकडण्यात आले. शनिवारी न्यायालयात उपस्थित करण्यात येईल.

आसाराम चोरमले, ठाणेदार, गाडगेनगर

Web Title: doctor husband pankaj diwan arrested in Priyanka Diwan murder case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.