अज्ञानी झाले डॉक्टर!

By admin | Published: April 8, 2016 11:59 PM2016-04-08T23:59:08+5:302016-04-08T23:59:08+5:30

तुमच्या शरीरातील महत्त्वपूर्ण अवयवांची स्थिती चिंताजनक झाली आहे, अशी भविष्यवाणी वैद्यकशास्त्रचा अभ्यास नसलेल्या ...

Doctor ignorant! | अज्ञानी झाले डॉक्टर!

अज्ञानी झाले डॉक्टर!

Next

हेल्थ क्लब : किडनी, लिव्हर, हृदयाचे सांगतात आरोग्य
अमरावती : तुमच्या शरीरातील महत्त्वपूर्ण अवयवांची स्थिती चिंताजनक झाली आहे, अशी भविष्यवाणी वैद्यकशास्त्रचा अभ्यास नसलेल्या कुण्या सामान्य व्यक्तिने केली तर तुम्ही ती मानणार काय? नाही ना? परंतु सर्वत्र सुळसुळाट झालेल्या 'हेल्थ क्लब'मध्ये वैद्यकशास्त्रातील 'व'देखील ठाऊक नसलेल्या व्यक्ती नागरिकांच्या किडनी, लिव्हर, हृदयाचे आरोग्य सांगत सुटले आहेत. पोलीस आणि आरोग्य विभागाने त्यांना प्रतिबंध करण्याची गरज निर्माण झाली आहे.
विदेशी कंपन्यांचे महागडे 'न्यूट्रीशन शेक' विकणाऱ्या या 'हेल्थ क्लब'मध्ये अत्यंत आक्षेपार्हरीत्या अवयवांच्या स्थितीबाबतची माहिती दिली जाते. तुमच्या शरीरातील हृदय, किडनी, लिव्हर, पाठीचा कणा, मसल्स असल्या महत्त्वपूर्ण भागांबाबत ठामपणे भाष्य करतात. शरीराचे हे भाग फॅट्समुळे अकार्यक्षम होऊ लागल्याचे ठामपणे सांगतात. हे अवयव कधीही बंद पडू शकतात, असे भाकीतही करतात. जी मंडळी ग्राहकांना त्यांच्या विविध अवयवांची माहिती देतात, त्यांना ते उल्लेख करीत असलेल्या अवयवांचे शरीरातील नेमके स्थान कुठे आहे, हेदेखील माहिती नसते. कुठल्या अवयवाचे कार्य काय, याचे सूक्ष्म ज्ञान त्यांना नसते. प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स, विविध व्हिटामिन्स यांचे प्रमाण घातकरीत्या दिले गेलेत तर जबाबदार कोण, हा प्रश्न हेल्थ क्लबच्या कार्यप्रणालीतून निर्माण होतो. (विशेष प्रतिनिधी)

सीएस, डीएचओ घेणार का दखल ?
हेल्थ क्लबच्या माध्यमातून अज्ञानी लोक शरीरशास्त्र आणि आहार सेवनाविषयी मार्गदर्शन करीत आहेत. शरीरातील विविध अवयवांवर फॅट्स वाढल्यामुळे आता त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. हे अवयव कधीही कार्य थांबवू शकतात, अशा आशयाचा सल्ला अज्ञानी लोक राजरोसपणे देत आहेत. जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी अशा लोकांवर कारवाई करणे गरजेचे झाले आहे.

पोलीस आयुक्तांनीही आवळाव्या मुसक्या
'हेल्थ क्लब'च्या नावावर सुरू असलेला गोरखधंदा अधिकाधिक मिळकतीचा करण्यासाठी वैद्यक वा आहार शास्त्राचे कुठलेही शिक्षण नसलेले लोक वैद्यकीय सल्ले देऊ लागले आहेत. भय निर्माण करून 'न्यूट्रीशन शेक' विकणाऱ्या या बोगस आहारतज्ज्ञांच्या मुस्क्या पोलिसांनी आवळायलाच हव्यात. बोगस डॉक्टरांप्रमाणेच ही अज्ञानी मंडळी दिशाभूल करीत असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका होऊ शकतो.

Web Title: Doctor ignorant!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.