वयाच्या चाळिशीनंतर वाहन परवाना काढण्यासाठी लागणार डॉक्टरांचे प्रमाणपत्र!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 11:55 AM2021-08-17T11:55:44+5:302021-08-17T12:00:11+5:30

Amravati News वयाच्या चाळिशीनंतर वाहन परवाना काढायचा असेल किंवा त्याचे नुतनीकरण करायचे असेल तर एमबीबीएस अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या डॉक्टरचेच ऑनलाईन प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आले आहे.

Doctor's certificate required to get a license after the age of 40! | वयाच्या चाळिशीनंतर वाहन परवाना काढण्यासाठी लागणार डॉक्टरांचे प्रमाणपत्र!

वयाच्या चाळिशीनंतर वाहन परवाना काढण्यासाठी लागणार डॉक्टरांचे प्रमाणपत्र!

Next
ठळक मुद्देमहिनाभरात तीन हजार जणांना ऑनलाईन लायसन्सऑफलाईनसाठी आरटीओत गर्दी

संदीप मानकर 

लोकमत न्यूज नेटवर्क 

अमरावती: आता घरबसल्या ऑनलाईन लायसन्स काढले जात आहे. वयाच्या चाळिशीनंतर वाहन परवाना काढायचा असेल किंवा त्याचे नुतनीकरण करायचे असेल तर एमबीबीएस अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या डॉक्टरचेच ऑनलाईन प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आले आहे. (Doctor's certificate required to get a license after the age of 40)

लर्निंग लायसन्स ऑनलाईन?

आरटीओच्या सारथी पोर्लटवर जावून उमेदवारांना आरटीओने ठरवून दिलेले नियमानुसार शुल्क भरुन ऑनलाईन आपार्टमेंट घ्यावी लागते. त्यानंतर ऑनलाईन परिक्षा घेवून लर्निंग ऑनलाईन लायसन्स काढता येते. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर आरटीओत गर्दी होवू नये, म्हणून परिवहन विभागाने सदर ऑनलाईन लायसन्स घरी बसूनच काढता येणार असल्याची मुभा दिली आहे. मात्र आरटीओत येवून ऑफलाईन पद्धतीने सुद्धा लायसन्स काढता येते. ज्यांना ऑनलाईन लायसन्स काढता येत नाही ते ऑफलाईन लायसन्स काढण्याकरीता आरटीओत गर्दी करीत आहेत.

महिनाभरात ३ हजार जणांना लायसन्स

रोज १०० ते १५० जणांना ऑनलाई न लर्निंग लायसन्स मिळत आहे. तेवढेच लायसन्स ऑफलाईन पद्धतीने सुद्धा काढण्यात येत आहेत. उमेदवाराला घरीबसून ऑनलाईन लायसन्सची प्रक्रिया माहिती नसेल तर ऑनलाईन अर्ज व शुल्क भरण्यासाठी पुन्हा त्यांना खासगी एजंटचा सहारा घ्यावा लागत आहेत. आता पर्यंत महिनाभरात तीन हजार जणांनी ऑनलाईन पद्धतीने लायसन्स काढल्याची माहिती एआरटीओ सिद्धार्थ ठोके यांनी दिली.

वयाच्या किती वर्षापर्यंत दिले जाते लायसन्स

वाहन चालविण्याचा परवाना घेण्यासाठी कुठल्याही वयाची अट नाही मात्र वाहन चालविण्याकरीता उमेदवार फिट असल्याचे प्रमाणपत्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिले पाहिजे असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

डॉक्टरला मिळणार लॉगीन

वयाच्या चाळिशीनंतर लायसन्स काढण्याकरीता एमबीबीएस डॉक्टरांचे वैद्यकीय प्रमाणपत्र लागणार असल्याचे पत्र परिवहन विभागाने आरटीओला पाठविले आहे. मात्र अद्याप तरी याकरीता एकाही डॉक्टरांची नेमणूक केली नाही आरटीओकडे इच्छुक डॉक्टरांनी संपर्क केला तर त्यांना आरटीओच्यावतीने अधिकृत प्रमाणपत्र देण्याकरीता युजर आईडी व पासवर्ड देण्यात येणार असल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी रामभाऊ गिते यांनी सांगितले.

वयाच्या चाळिशीनंतर एमबीबीएस डॉक्टरांचे तपासणीचे वैद्यकीय प्रमाणपत्र लायसन्स काढताना बंधनकारक लागणार आहे. तसे पत्र आरटीओला प्राप्त झाले असून अद्याप तरी या प्रक्रियेसाठी एकाही डॉक्टरांची नेमणूक केली नाही. आमच्याकडे डॉक्टरांनी संपर्क केल्यास त्यांना युजर आईडी पासर्वड दिला जाणार आहे.

रामभाऊ गिते प्रादेशिक परिवहन अधिकारी अमरावती

Web Title: Doctor's certificate required to get a license after the age of 40!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.