महाराष्ट्र होमियो डॉक्टर्स असोसिएशनच्यावतीने डॉक्टर्स डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:09 AM2021-07-03T04:09:24+5:302021-07-03T04:09:24+5:30

फोटो पी ०२ डॉक्टर अमरावती : डॉक्टरला देवाचे रूप मानले जाते. भारतात १ जुलै हा दिवस डॉक्टर्स डे म्हणून ...

Doctor's Day on behalf of Maharashtra Homoeo Doctors Association | महाराष्ट्र होमियो डॉक्टर्स असोसिएशनच्यावतीने डॉक्टर्स डे

महाराष्ट्र होमियो डॉक्टर्स असोसिएशनच्यावतीने डॉक्टर्स डे

Next

फोटो पी ०२ डॉक्टर

अमरावती : डॉक्टरला देवाचे रूप मानले जाते. भारतात १ जुलै हा दिवस डॉक्टर्स डे म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्र होमियो डॉक्टर्स असोसिएशनच्यावतीने नुकताच डॉक्टर्स डे साजरा करण्यात आला याप्रसंगी डॉक्टरांन प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सामाजिक संस्थांच्यावतीने डॉक्टरांचा सन्मान करण्यात आला.

----------------------

शिक्षणाच्या सावळागोंधळात भर

अमरावती : कोरोनाकाळात शाळा बंद असतानाही शासनाकडून प्राप्त निर्देशानुसार विद्यार्थ्यांकडून जुनी पाठ्यपुस्तके परत घेण्याचे काम सुरू आहे. शिक्षकांकडून दररोज पालकांना सूचना करून पुस्तके परत मागितली जात आहे. आता शिक्षणमंत्र्यांनी 'विद्यार्थ्यांकील जुनी पुस्तके शाळेत जमा न करता सेतू अभ्यासक्रमाकरिता वापरावीत, अशी घोषणा केली. त्यामुळे या सावळ्या गोंधळाने शिक्षणाबाबत एक ना धड, भाराभर चिंध्या, अशीच अवस्था असल्याचे दिसून येत आहे.

----------------------

राज्यमंत्र्यांकडून सिंचन प्रकल्पांचा आढावा

अमरावती : जिल्ह्यातील मध्यम व लघु सिंचन प्रकल्पांची तसेच कालव्यांची रखडलेली कामे पूर्ण होण्यासाठीच्या कार्यवाहीला वेग द्यावा. आवश्यक बाबींसाठी प्रस्ताव आदींचा शासनस्तरावर पाठपुरावा करावा. मात्र, कुठल्याही परिस्थितीत कामे रखडता कामा नयेत, असे स्पष्ट निर्देश जलसंपदा राज्यमंत्री बच्चु कडू यांनी शुक्रवारी येथे दिले.

---------------------

विभागीय आयुक्तालयात वसंतराव नाईक यांना अभिवादन

अमरावती : विभागीय आयुक्त कार्यालयात गुरुवारी माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपायुक्त संजय पवार, गजेंद्र बावणे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

---------------------

जर्मनीत मिळणार रोजगाराची संधी

अमरावती : व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण खात्यांतर्गत ‘जर्मन ड्युएल कॉलीफिकेशन फॉर व्होकेशनल स्टुडंट’करिता राज्यस्तरीय वेबीनारचे ॲपव्दारे २२ जूनला आयोजन करण्यात आले होते. प्रकल्पाचे समन्वयक कवी लुथरा यांनी वेबीनारमध्ये परदेशात बांधकाम क्षेत्रात विद्यार्थ्यांसाठी रोजगाराची उपलब्धता, संधी, कार्याची रुपरेषा, मानधन व पुढील शिक्षणाबाबत विस्तृत माहिती दिली. या उपक्रमात जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी सहभाग नोंदवून लाभ घेण्याचे आवाहन व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संस्थेव्दारे करण्यात आले आहे.

---------------------

आता ‘शाळा बंद पण शिक्षण सुरु’ कार्यक्रम

अमरावती : शैक्षणिक सत्रात २८ जूनपासून शालेय कामकाज सुरू झाले आहे. कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे विद्यार्थ्यांची प्रत्यक्षात शाळेत उपस्थिती नाही. परंतु विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू राहण्यासाठी नियोजनपूर्वक कार्यवाही सर्व शाळांनी करणे आवश्यक आहे. याकरिता ‘शाळा बंद पण शिक्षण सुरू’ या कार्यक्रमांतर्गत मागील सत्रात सुरू केलेले विविध उपक्रम यावर्षीसुद्धा सुरू ठेवण्यात यावेत. त्याबाबतचे योग्य ते नियोजन मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांनी करावे, असे आवाहन शिक्षण विभागाव्दारे करण्यात आले आहे.

---------------------

महापालिकेत दादासाहेब खापर्डे यांची पुण्‍यतिथी

अमरावती : १ जुलै रोजी वसंतराव नाईक यांच्‍या जयंतीनिमित्त वसंतराव नाईक यांच्‍या प्रतिमेला हारार्पण महापौर चेतन गावंडे यांच्या हस्‍ते विश्‍वरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात करण्‍यात आले. तसेच दादासाहेब खापर्डे यांच्‍या पुण्‍यतिथीनिमित्त महापौर चेतन गावंडे यांच्या हस्‍ते राजकमल चौकातील दादासाहेब खापर्डे यांच्‍या पुतळ्याला हारार्पण करण्‍यात आले.

Web Title: Doctor's Day on behalf of Maharashtra Homoeo Doctors Association

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.