लायन्स क्लबतर्फे वृक्षारोपण करून डॉक्टर्स डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:10 AM2021-07-02T04:10:16+5:302021-07-02T04:10:16+5:30

राष्ट्रीय डॉक्टर दिन हा दिवस भारतात दरवर्षी एक जुलै रोजी साजरा केला जातो. डॉक्टरवर्गाच्या समाजातील अतूल्य योगदानाबद्दल आणि त्यांना ...

Doctor's Day by planting trees by the Lions Club | लायन्स क्लबतर्फे वृक्षारोपण करून डॉक्टर्स डे

लायन्स क्लबतर्फे वृक्षारोपण करून डॉक्टर्स डे

Next

राष्ट्रीय डॉक्टर दिन हा दिवस भारतात दरवर्षी एक जुलै रोजी साजरा केला जातो. डॉक्टरवर्गाच्या समाजातील अतूल्य योगदानाबद्दल आणि त्यांना मानवंदना देण्यासाठी हा दिवस संपूर्ण देशात मोठ्या उत्साहाने पाळला जातो. डॉक्टरांचे आपल्या आयुष्यातील योगदान किती महत्त्वपूर्ण आहे, हे तुम्हाला वेगळे सांगायला नको. गेल्या दोन वर्षांपासून आपण कोरोनाशी लढा देत आहोत. या काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून अनेकांचे प्राण वाचवण्यासाठी डॉक्टरच आघाडीवर होते. आज या डॉक्टर दिनाच्या निमित्ताने लायन्स क्लब, अचलपूरतर्फे ग्रंथ, पुष्प व सर्टिफिकेट देऊन डॉक्टरांना गौरविण्यात आले. हा कार्यक्रम श्री साईनाथ मंदिर, कांडली या ठिकाणी घेण्यात आला. यावेळेस साई मंदिर संस्थानतर्फेही डॉक्टरांना शाल व श्रीफळ देऊन गौरविण्यात आले.

सर्वप्रथम साई मंदिर परिसरात डॉक्टरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर लायन्स क्लब, अचलपूर व श्री साई मंदिर, कांडली यांच्या वतीने

डॉ. प्रमोद शेटे, डॉ. शरद अडोणी, डॉ. इंद्रनील ठाकरे व डॉ. हर्षद मडघे यांचा सत्कार घेण्यात आला.

यावेळेस लायन्स क्लबचे अध्यक्ष पंकज गुप्ता, सचिव डॉ. हर्षद मडघे, कोषाध्यक्ष नवीन दंडाळे, प्रमोद सावदेकर, राजेश अग्रवाल, अभय कुळकर्णी, पंकज शर्मा, भरत अग्रवाल, राजकुमार महल्ले, राहुल ठाकरे आदी सदस्य उपस्थित होते. त्याचप्रमाणे साई मंदिर संस्थानचे उपाध्यक्ष हरिदासजी भुस्कट, सचिव दादरावजी मडघे, सहसचिव चंद्रशेखर लांडे, कोषाध्यक्ष ज्ञानेश्वर हिरुळकर, साहेबरावजी यावले, श्रीकृष्ण बनसोड, शरद नाथे, सुनील लहाने, श्रीराम अडकिने महाराज व दर्शन माकोडे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर हर्षद मडघे यांनी केले. नवीन दंडाळे यांनी आभार मानले.

010721\img-20210701-wa0030.jpg

लायन्स क्लबतर्फे डॉक्टर डे

Web Title: Doctor's Day by planting trees by the Lions Club

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.