प्रशिक्षणाच्या पहिल्या दिवशी डॉक्टराचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2019 01:20 AM2019-08-20T01:20:09+5:302019-08-20T01:20:43+5:30

येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात प्रशिक्षणाच्या पहिल्या दिवशी महिला डॉक्टरचा मृत्यू झाला. ज्योत्स्ना राजीव पवार (४३, रा. श्रीकृष्णपेठ, मोर्शी) असे मृताचे नाव आहे. सोमवारी सकाळी ही घटना घडली. हृदयविकाराने त्यांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Doctor's death on the first day of training | प्रशिक्षणाच्या पहिल्या दिवशी डॉक्टराचा मृत्यू

प्रशिक्षणाच्या पहिल्या दिवशी डॉक्टराचा मृत्यू

Next
ठळक मुद्देइर्विन रुग्णालयातील घटना : कम्युनिटी हेल्थ आॅफिसर पदावर झाली होती नियुक्ती

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात प्रशिक्षणाच्या पहिल्या दिवशी महिला डॉक्टरचामृत्यू झाला. ज्योत्स्ना राजीव पवार (४३, रा. श्रीकृष्णपेठ, मोर्शी) असे मृताचे नाव आहे. सोमवारी सकाळी ही घटना घडली. हृदयविकाराने त्यांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ज्योत्स्ना पवार यांना नुकतीच कम्युनिटी हेल्थ आॅफिसर म्हणून नियुक्ती मिळाली होती. त्यांच्या मृत्यूबाबत डॉक्टर व परिचारिका हळहळ व्यक्त होत आहे.
मोर्शी स्थित श्रीकृष्ण पेठ येथील रहिवासी ज्योत्स्ना पवार यांचे पती राजीव यांचा कापडविक्रीचा व्यवसाय आहे. पती व सातवीत शिकणारा मुलगा यांच्यासोबत त्या मोर्शीत राहत होत्या. ज्योत्स्ना पवार यांनी बीएएमएसचे शिक्षण पूर्ण करून आरोग्य सेवा सुरू केली होती. आपत्कालीन सेवेच्या १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेवर त्यांनी आतापर्यंत आरोग्यसेवा पुरविली. दरम्यानच्या काळात त्यांनी आयुष्मान भारत प्रकल्प अंतर्गत भरती करण्यात येत असलेल्या ‘कम्युनिटी हेल्थ आॅफिसर’ पदासाठी प्रयत्न सुरू केले. त्यासाठी अकोला येथे लेखी परीक्षा पार पडली. यामध्ये ज्योत्स्ना पवार उत्तीर्ण झाल्या. शासकीय नोकरीत आरोग्य सेवा पुरविण्याचा त्यांना आनंदच झाला होता.
दरम्यान, कम्युनिटी हेल्थ आॅफिसर पदाची जबाबदारी सांभाळण्यापूर्वी जिल्हा सामान्य रुग्णालयात १९ आॅगस्टपासून प्रशिक्षणाला सुरुवात होणार होती. सहा महिने हे प्रशिक्षण चालणार होते. त्या अनुषंगाने ज्योत्स्ना पवार सोमवारी जिल्हा सामान्य रुग्णालयात पोहोचल्या. थम्बद्वारे उपस्थितीचा सोपस्कार पार पाडून त्या प्रशिक्षण कक्षाकडे निघाल्या. त्याचवेळी टेलिफोन आॅपरेटर कक्षासमोर त्या जमिनीवर कोसळल्या. तेथील कर्मचाऱ्यांनी तात्काळ ज्योत्स्ना पवार यांना उचलून ओपीडी कक्षात नेले. डॉक्टरांनी तपासणी सुरू केल्यानंतर काही वेळातच त्यांना मृत घोषित करण्यात आले.

‘आयुष्मान भारत’च्या कम्युनिटी हेल्थ आॅफिसर पदाच्या प्रशिक्षणासाठी आलेल्या महिला डॉक्टराचा मृत्यू झाला. हृदयविकाराने मृत्यू झाल्याची शक्यता आहे.
- श्यामसुंदर निकम, जिल्हा शल्यचिकित्सक

Web Title: Doctor's death on the first day of training

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.