‘त्या’ दाम्पत्यासह डॉक्टरांवरही फौजदारी
By admin | Published: February 20, 2016 12:45 AM2016-02-20T00:45:45+5:302016-02-20T00:45:45+5:30
आई मरण पावली असताना पैशाच्या लालसेपोटी ती जिवंत दाखवून तिच्या सेवानिवृत्तीचे चार लाख रुपये ...
गुन्हा दाखल : मृताच्या नावे उकळली रक्कम
अमरावती : आई मरण पावली असताना पैशाच्या लालसेपोटी ती जिवंत दाखवून तिच्या सेवानिवृत्तीचे चार लाख रुपये सफाई कर्मचारी पती-पत्नीने उचल केल्याप्रकरणी शुक्रवारी फौजदारी दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी गणेश ढेंढवाल, छाया ढेंढवाल या पती, पत्नीसह गोपाल जोशी या डॉक्टरवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
पोलीस सूत्रानुसार, लक्ष्मी प्रेम ढेंढवाल या महापालिकेत सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत होत्या. त्यांचा मृत्यू १३ एप्रिल २०१३ रोजी झाला असताना त्यांचे सुपूत्र गणेश ढेंढवाल व सून छाया ढेंढवाल यांनी त्या जीवंत असल्याचे भासवून त्यांना मिळणारी सेवानिवृत्तीची रक्कम उचल केली. तसेच लक्ष्मी ढेंढवाल यांना पतीची मिळणारी सेवानिवृत्तीची रक्कम देखील उचलण्याचा प्रताप करण्यात आला. लक्ष्मी ढेंढवाल या जिवंत असल्याबाबतचे प्रमाणपत्र स्थानिक चिचफैल येथील रहिवासी जी. एस. जोशी यांनी दिल्याची माहिती निदर्शनास आली आहे. हा प्रकार लेखा विभागात पडताळणीच्या वेळी उघडकीस आला. गणेश व छाया ढेंढवाल यांनी मृत लक्ष्मी ढेंढवाल यांच्या नावे बँकेत सेवानिवृत्तीचे ४ लाख रुपये उचल केल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. महापालिका व बडनेऱ्यातील बॅक आॅफ़ महाराष्ट्र शाखेची फसवणूक झाल्याप्रकरणी शहर कोतवाली पोलीस ठाण्यात महापालिकेचे स्वास्थ अधिकारी अरुण तिजारे यांनी तक्रार दाखल केली. फौजदारी कारवाई आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्या आदेशानुसार करण्यात आली आहे. अरुण तिजारे यांच्या तक्रारीवरुन गणेश ढेंढवाल, छाया ढेंढवाल व डॉ. गोपाल जोशी यांच्याविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. फसवणूक झाल्याप्रकरणी तक्रार दाखल केली. ठाणेदार शर्मा यांच्या मार्गदर्शनात तपास सुरु करण्यात आला आहे.