कोरोना संक्रमणाबाबत महावितरण कर्मचाऱ्यांना डॉक्टरांकडून मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:13 AM2021-05-09T04:13:31+5:302021-05-09T04:13:31+5:30
अमरावती : कोरोनाच्या दुसऱ्या वेवचा प्रसार बघता महावितरण कर्मचारी कचाट्यात सापडत आहे. कोरोना महामारीच्या परिस्थितीत सुरळीत वीजपुरवठ्यासाठी महावितरण कर्मचाऱ्यांच्या ...
अमरावती : कोरोनाच्या दुसऱ्या वेवचा प्रसार बघता महावितरण कर्मचारी कचाट्यात सापडत आहे. कोरोना महामारीच्या परिस्थितीत सुरळीत वीजपुरवठ्यासाठी महावितरण कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देत मुख्य अभियंता सुचित्रा गुजर यांच्या पुढाकाराने व रेडीयंट हॉस्पिटल व रिहॅबिलेशन सेंटर यांच्या तज्ज्ञ डॉक्टरांकडून महावितरण अमरावती परिमंडलातील कर्मचाऱ्यांना कोरोना विषाणूवर आणि लसीकरणाबाबत वेबीनारव्दारे सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
विजेचे ज्त्त्त्कुकोणी नाकारू शकत नसले तरी, सुरळीत वीजपुरवठ्यासाठी महावितरणच्या कर्मचाऱ्यांना दिवस-रात्र वेगवेगळया शिफ्टमध्ये काम करावे लागत आहे. घर ते रुग्णलये अशा सर्वच ठिकाणी आवशक असणाऱ्या विजेच्या सुरळीत पुरवठ्यासाठी महावितरण कर्मचारी सुरक्षित असणे गरजेचे आहे. महावितरणच्या कर्मचाऱ्यांना आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्याबाबत आणि शासनाच्या मार्गदर्शक सूचना पाळण्याबाबत नियमित आणि वेळोवेळी सूचना निर्गमित करण्यात येतात. यासोबतच आरोग्य तज्ज्ञांच्या मदतीने वेबिनारच्या सहाय्याने कोरोना विषाणूसंदर्भात कर्मचाऱ्यांमध्ये जनजागृतीही करण्यात आली. यावेळी अधीक्षक अभियंता अनिल वाकोडे, सुरेश मडावी आणि दिलीप खानंदे यांच्यासह २६० कर्मचारी उपस्थित होते.