जलवाहिनीतून निघाला सडलेला कुत्रा

By Admin | Published: January 13, 2015 10:51 PM2015-01-13T22:51:38+5:302015-01-13T22:51:38+5:30

नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या दुर्लक्षामुळे जलवाहिनीत काहीतरी अडकल्याने गेल्या तीन दिवसांपासून अचलपुरात दोन वार्डांचा पाणीपुरवठा बंद झाला होता. जेथे नळांना पाणी येत होते,

Dog | जलवाहिनीतून निघाला सडलेला कुत्रा

जलवाहिनीतून निघाला सडलेला कुत्रा

Next

दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा : जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी
अचलपूर : नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या दुर्लक्षामुळे जलवाहिनीत काहीतरी अडकल्याने गेल्या तीन दिवसांपासून अचलपुरात दोन वार्डांचा पाणीपुरवठा बंद झाला होता. जेथे नळांना पाणी येत होते, त्या पायाची दुर्गंधी येत होती. अखेर सोमवारी जलवाहिनीचे काम सुरू केले असता मंगळवारी सडलेला कुत्रा आढळून आला. जलवाहिनीत कुत्रा शिरेपर्यंत कर्मचारी गाफिल राहत असल्यामुळे नागरिकांनी चिड व्यक्त केली. चावलमंडीत परिसरात दुरुस्तीचे काम करण्यासाठी मोठा खड्डा करण्यात आल्याने बघ्यांची तोबा गर्दी उसळली होती.
दोन वॉर्डांना पाणी पुरवठा
अचलपूर शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी दुल्हा गेटजवळ मोठी टाकी आहे. या टाकीला झाकण नाही. या टाकीवर नेहमी माकड खेळत असतात. पक्ष्यांचा किलबिलाट सुरू असतो. या दरम्यान त्या टाकीत एखादा पक्षी किंवा माकड पडले असावे ते मुख्य जलवाहिनीतून उपवाहिनीत गेले तेथे ते अडकल्याने कासदपूरा, मोमिनपुरा, तेलीपुरा आदी भागातील पिण्याच्या पाण्याचे नळाचे पाणी बंद झाले होते. त्या पाण्याला दुर्गंधी येत होती. यामुळे येथील रहिवाशांनी नगरपालिकेत तक्रारी केल्या. अनेक नागरिकांनी तक्रारी केल्याने अखेर काल संध्याकाळपासून कामाला सुरुवात करण्यात आली.
चावलमंडी या वर्दळीच्या रस्त्याच्या मधात खड्डा खोदून तेथून गेलेल्या जलवाहिनीत अडकलेल्या मृत प्राण्याचा शोध सुरू करण्यात आला. त्या वाहिनीतून चार-पाच मासाचे तुकडे निघाल्याचे उपस्थितांनी सांगितले. खड्डा खोदतांना दुर्गंधी येत होती. तर जलवाहिनी फोडल्यानंतर दुर्गंधी पसरली होती. सदर ठिकाणी रस्त्याच्या मधातून खोदण्यात आलेला मोठा खड्डा व तेथे जमलेल्या तोबा गर्दीमुळे या रस्त्याने ये-जा करणाऱ्या वाहनधारकांची तारांबळ उडाली. बघ्यांची गर्दी वाढत गेल्याने गोंधळ निर्माण होऊन काही वेळा वादही निर्माण झाला. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Dog

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.