श्वानांची कागदोपत्रीच नसबंदी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 11:43 PM2017-11-14T23:43:18+5:302017-11-14T23:43:53+5:30

राज्यात सर्वाधिक श्वानांची नसबंदी कागदोपत्रीच करून कंत्राटदारांना गब्बर केले जात असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते बबलू शेखावत यांनी मंगळवारी केला.

Dog Shot | श्वानांची कागदोपत्रीच नसबंदी!

श्वानांची कागदोपत्रीच नसबंदी!

Next
ठळक मुद्देविरोधी पक्षनेत्याचा आरोप : काँग्रेस एकवटली

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : राज्यात सर्वाधिक श्वानांची नसबंदी कागदोपत्रीच करून कंत्राटदारांना गब्बर केले जात असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते बबलू शेखावत यांनी मंगळवारी केला. पशू शल्यचिकित्सक सचिन बोंद्रे यांना विलास इंगोले आणि शेखावतांच्या संतापाचा सामना करावा लागला.
शहरातील विविध समस्यांबाबत शेखावत यांच्या नेतृत्वात काँग्रेस नगरसेवकांची महापालिका सभागृहात बैठक पार पडली. यावेळी आयुक्त हेमंत पवार, दोन्ही उपायुक्त उपस्थित होत्या. स्वच्छतेचा बट्ट्याबोळ झाल्याचे त्यांनी आयुक्तांच्या लक्षात आणून दिले. एकल कंत्राटावर ३० कोटी खर्च करण्यासाठी सुमारे ६ कोटींचा निधी मनपा फंडातून निधी वळवावा लागेल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्यावर नगरसेवकांच्या हक्काचा निधी एकल कंत्राटासाठी वापरू देणार नाही, असा इशारा शेखावत यांनी दिला. रस्ते-नाल्यांची स्वच्छता, खड्डे, मोकाट जनावरे, वाढत्या प्रदूषणावर प्रशासनाला त्यांनी धारेवर धरले. शेखावत आणि इंगोले यांनी बोंद्रेंना श्वानांच्या नसबंदीबाबत आयुक्तांना वास्तव सांगण्याची सूचना केली. यावेळी नगरसेवक शेख जफर, प्रशांत डवरे, सलीम बेग, प्रदीप हिवसे, अब्दुल वसीम, अनिल माधोगडिया, नीलिमा काळे, मंजुश्री महल्ले, शोभा शिंदे, वंदना कंगाले सुनीता भेले आदींची उपस्थिती होती.

सत्ताधारी सर्व आघाड्यांंवर अपयशी
भाजपच्या आठ महिन्यांच्याच सत्ताकाळात शहराचा पुरता बोजवारा उडाला. सत्ताधारी सर्व आघाड्यांवर अपयशी ठरल्याची टीका बबलू शेखावत यांनी केली. स्वच्छतेचा प्रश्न चिघळला असताना अन्य आघाड्यांवरही सामसूम आहे. भाजपला सत्ता चालविताच येत नसल्याचे माजी महापौर विलास इंगोले म्हणाले. प्रशासनाने बºयाच कालावधीनंतर विरोधी पक्षनेता, माजी महापौर यांची आक्रमकता अनुभवली.

Web Title: Dog Shot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.