घरगुती सिलिंडर पुन्हा २५ रुपयांनी महागले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:17 AM2021-08-21T04:17:09+5:302021-08-21T04:17:09+5:30

बॉक्स आठ महिन्यात १७६ रुपयांची वाढ महिना दर घरगुती व्यावसायिक रुपयांत जानेवारी ७१९ १४०८ फेब्रुवारी ७४४ ...

Domestic cylinders went up by Rs 25 again | घरगुती सिलिंडर पुन्हा २५ रुपयांनी महागले

घरगुती सिलिंडर पुन्हा २५ रुपयांनी महागले

Next

बॉक्स

आठ महिन्यात १७६ रुपयांची वाढ

महिना दर घरगुती व्यावसायिक रुपयांत

जानेवारी ७१९ १४०८

फेब्रुवारी ७४४ १५९८

मार्च ८४४ १६७४

एप्रिल ८३४ १७१२

मे ८३४ १६६६

जून ८३४ १५४४

जुलै ८६० १६८२

ऑगस्ट ८८५ १६९६

सबसिडी बंद, दरवाढ सुरूच

वाढत्या महागाईविरोधात जनसामान्यांचा आक्रोश असतानाही सरकारने मात्र सर्वसामान्यांच्या प्रश्नाकडे डोळेझाक केली आहे.

गॅसवर सबसिडी कमी करण्यात आली आहे. परंतु, गॅसचे दर प्रत्येक महिन्याला वाढत असल्याचे चित्र आहे. हे असेच राहिले तर लवकरच सिलिंडर एक हजाराचा पल्ला गाठण्यास वेळ लागणार नाही.

व्यावसायिक गॅस सिलिंडर स्वस्त

जुलै महिन्यात कमर्शियल गॅस सिलिंडरचे दर १६८२.५० रुपये होते. या महिन्यात कमर्शियल गॅस सिलिंडरचे दर १६९६ रुपये आहेत. मात्र, सर्वसामान्य ग्राहकांना असा दिलासा देण्याच्या बाबतीत सरकारकडून प्रयत्न होताना दिसत नाही. यामुळे नागरिकांमध्ये सरकारच्या धोरणाविरुद्ध रोष वाढताना दिसून येत आहे. कोरोनाने स्थिती बिकट झाली असताना महागाईचा सामना सामान्यांना करावा लागत आहे.

शहरात चुली कशा पेटवायच्या?

शासनामार्फत गॅस सिलिंडरवर पूर्वी सबसिडी मिळायची. ती आता मिळत नसतानाही वाढत्या महागाईत घरगुती सिलिंडरचे दर वाढविल्याने बजेट कोमडले आहे. यावर सरकारने विचार करायला हवे.

- वर्षा ठाकरे, गृहिणी

--

महागाई सतत वाढत आहे. सिलिंडर ८८४ रुपयांवर गेले आहे. वाढलेले दर सर्वसामान्यांना परवडणारे नाही. दर कमी करावे, अन्यथा आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल.

- मंगला बोरलकर, गृहिणी

Web Title: Domestic cylinders went up by Rs 25 again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.