ज्येष्ठ मतदारांमध्ये महिलांचा बोलबाला! '७०-१२० प्लस' वयोगटात पुरुषांपेक्षा महिला सहा हजारांनी जास्त

By गजानन उत्तमराव मोहोड | Published: March 2, 2024 09:34 PM2024-03-02T21:34:49+5:302024-03-02T21:35:24+5:30

मतदार यादीमध्ये पहिल्यांदाच महिलांचा टक्का वाढलेला दिसतोय

Dominance of women among senior voters! In the '70-120 plus' age group, women outnumber men by 6,000 | ज्येष्ठ मतदारांमध्ये महिलांचा बोलबाला! '७०-१२० प्लस' वयोगटात पुरुषांपेक्षा महिला सहा हजारांनी जास्त

ज्येष्ठ मतदारांमध्ये महिलांचा बोलबाला! '७०-१२० प्लस' वयोगटात पुरुषांपेक्षा महिला सहा हजारांनी जास्त

गजानन मोहोड, अमरावती: मतदारयादीमध्ये पहिल्यांदा महिलांचा टक्का वाढलेला आहे. यामध्ये ७० ते १२० प्लस या वयोगटात पुरुष मतदारांपेक्षा महिलांची संख्या तब्बल सहा हजारांनी जास्त आहे. यापूर्वी प्रत्येक वयोगटात पुरुषांचेच प्राबल्य होते. यावेळी मात्र ज्येष्ठ मतदारांत महिलांचाच बोलबाला राहणार आहे. सर्वच वयोगटात महिला मतदारांची संख्या मागच्या निवडणुकीच्या तुलनेत वाढली आहे. आता यादीत महिला मतदारांचे प्रमाण वाढले असले, तरी हे मतदार मतदानासाठी प्रत्यक्ष केंद्रांवर यावेत, यासाठी पुन्हा जिल्हा निवडणूक विभागाचे कसब लागणार आहे.

७० प्लस वयोगटातील तुलनात्मक मतदार

  • ७० ते ७९ वयोगट
  • पुरुष मतदार : ७१,९४७
  • महिला मतदार : ७२,१६०


८० ते ८९ वयोगट

  • पुरुष मतदार : २९,३२६
  • महिला मतदार : ३४,२५४


९० ते ९९ वयोगट

  • पुरुष मतदार : ६७०४
  • महिला मतदार : ७४५२


१०० ते १०९ वयोगट

  • पुरुष मतदार : ७३४
  • महिला मतदार : ७३६


११० ते ११९ वयोगट

  • पुरुष मतदार : ०२
  • महिला मतदार : ०६


१२० प्लस

  • पुरुष मतदार : ०१
  • महिला मतदार : ०१


सर्वच ज्येष्ठ वयोगटातील महिला मतदारांचे प्रमाण यावेळी वाढले आहे. या मतदारांनी प्रत्यक्ष केंद्रापर्यंत जाऊन मतदान करावे व याद्वारे मतदानाचा टक्का वाढवा, यासाठी विविध उपक्रम, अभियान राबविण्यात येणार आहे.
- सौरभ कटियार, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी

Web Title: Dominance of women among senior voters! In the '70-120 plus' age group, women outnumber men by 6,000

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.