मेळघाटात वनाधिकाऱ्याच्या निवासस्थानी पक्ष्यांना दानापाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:12 AM2021-04-27T04:12:34+5:302021-04-27T04:12:34+5:30
: फोटो पी २५ अनिल कडू फोल्डर अनिल कडू परतवाडा : मेळघाटात कार्यरत वनाधिकाऱ्याने शासकीय निवासस्थानी पक्ष्यांसाठी दानापाण्याची व्यवस्था ...
:
फोटो पी २५ अनिल कडू फोल्डर
अनिल कडू
परतवाडा : मेळघाटात कार्यरत वनाधिकाऱ्याने शासकीय निवासस्थानी पक्ष्यांसाठी दानापाण्याची व्यवस्था केली आहे. परिणामी, त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या पक्ष्यांचे वास्तव्य वाढीस लागले आहे. जवळपास वेगवेगळ्या प्रकारच्या चिमणयांसह १५ ते २० प्रकारचे पक्षी त्या ठिकाणी आढळून येत आहेत. यात एका सुगरण पक्षाने सुंदर घरटे तयार करून त्यात सुंदर अशा दोन पिल्लांना जन्म दिला आहे.
मेळघाटातील खंडूखेडा येथील शासकीय निवासस्थानी वनाधिकारी आशिष चक्रवर्ती हे चार वर्षांपासून उन्हाळ्याच्या दिवसांत पक्ष्यांकरिता दानापाणी ठेवत आहेत. या वेगवेगळ्या पक्ष्यांचे व्हिडीओ चित्रीकरणही त्यांनी केले आहे. यातील काही पक्षांचे व्हिडीओ विशिष्ट दिवसाला व सणाला आपल्या मोबाईलमध्ये स्टेटस म्हणूनही ते ठेवत आहेत.
उन्हाळ्याच्या दिवसांत मेळघाटमध्ये जाणवणारी तीव्र पाणीटंचाई आणि वाढते तापमान बघता आशिष चक्रवर्ती यांचा हा प्रयोग मेळघाटात प्रत्येक शासकीय कर्मचाऱ्याने आपल्या जंगलातील शासकीय निवासस्थानी राबविणे गरजेचे झाले आहे. चक्रवर्ती यांचा प्रयोग उन्हाळ्याच्या दिवसात, मेळघाटातील पशुपक्षांकरिता दिलासादायक ठरला आहे.
टाकाऊतून टिकाऊ
उपक्रमशील वनपाल आशिष चक्रवर्ती यांनी स्वतःच्या संकल्पनेतून टाकाऊ वस्तूपासून जंगलातील आग पाहण्यासाठी फायर वॉच टाॅवर उभे केले. याचे माध्यमातून त्यांनी त्यांच्या वर्तुळात मागील दोन वर्षांत आगीच्या घटनांवर नियंत्रण मिळविले. वर्तुळात आग लागू दिली नाही. हे फायर वॉच टाॅवर केवळ त्यांच्या वर्तुळासह संपूर्ण जारिदा वनपरिक्षेत्राकरिता बहुपयोगी ठरले. या टॉवरकरिता त्यांनी जंगलातील टाकाऊ लाकडासह ग्रीन नेटचा वापर केला. यात त्यांनी वनमजुरांचा सहभाग घेतला. यापूर्वी स्वतःचे नेटवर्क वाढवून जवळपास चार ते पाच वेळा त्यांनी वाघ व बिबट्याची कातडी आरोपींसह पकडून देण्यात उल्लेखनीय जबाबदारी पार पाडली आहे.