रक्तपेढीकरिता २० लाखांची जागा दान
By admin | Published: August 19, 2016 12:22 AM2016-08-19T00:22:04+5:302016-08-19T00:22:04+5:30
ग्रामीण रुग्णालय संलग्नित रक्तदाता संघ व नागपूरच्या मो. रफी फॅन्स क्लबच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्यदिनाच्या संध्येला....
शाम खंडेलवाल यांची दानशूरता : स्वातंत्र्यदिनी गीतांचा बहारदार कार्यक्रम
वरूड : ग्रामीण रुग्णालय संलग्नित रक्तदाता संघ व नागपूरच्या मो. रफी फॅन्स क्लबच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्यदिनाच्या संध्येला देशभक्तीपर गीतांचा ‘गीतो के रंग, रक्तदाताओंके संग’ हा आॅर्केस्ट्रा स्थानिक माधवराव काठीवाले सभागृहात घेण्यात आला. यावेळी उद्योगपती व बाजार समितीचे संचालक शामलाल खंडेलवाल यांनी रक्तपेढीकरीता एक हजार चौरस फूट बाजारमूल्याप्रमाणे २० लाख रुपयांची जागा दान दिली.
येथील रक्तदाता संघाच्या अभूतपूर्व कार्याची दखल नागपूरच्या मो.रफी फॅन्स क्लबचे संचालक मो. सलीम यांनी घेऊन स्वातंत्र्यदिनी ‘गीतो रंग, रक्तदाता के संग’ हा देशभक्तीपर सुमधूर गीतांचा कार्यक्रम मोफत सादर केला. यावेळी मनीष खंडेलवाल यांच्या स्मृतीप्रित्यर्थ शामलाल खंडेलवाल यांनी जागा दान दिली. इतकेच नव्हे, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने जितेन शहा यांनी कॉफी मशिनकरिता १५ हजार रुपये दिले. मंगेश काठीवाले यांनी कार्यक्रमाकरिता सभागृह विनामूल्य उपलब्ध करून दिले. याबद्दल त्यांचा आ.अनिल बोंडे, माजी आमदर नरेशचंद्र ठाकरे, नगराध्यक्ष रवींद्र थोरात, ठाणेदार गोरख दिवे, बेनोड्याचे ठाणेदार शांतीकुमार पाटील, जायन्टसचे अध्यक्ष नितीन खेरडे, राकाँचे जितेन शहा, माजी तालुका तालुका आरोग्य अधिकारी नारायण फरकाडे आदींच्या हस्ते गौरव करण्यात आला.
कार्यक्रमात देशभक्तीपर गीते आणि लावण्या देखील सादर करण्यात आल्यात. प्रेक्षकांनी कार्यक्रमाचा मनसोक्त आनंद लुटला. कार्यक्रमाकरिता ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक प्रमोद पोतदार, रक्तदाता संघाचे अध्यक्ष जितेंद्र शेटिये, उपाध्यक्ष प्रवीण चौधरी, दिलीप भोंडे, सचिव चरण सोनारे, शैलेश धोटे, संजय खासबागे, योगेश ठाकरे, पंंकज केचे, सुधाकर राऊत, प्रवीण खासबागे, सचिन परिहार, अतुल काळे, यशपाल जैन, रोशन दारोकर, आशिष वानखडे, मनोहर थेटे, मुन्ना चांडक, गजानन दापूरकर, मुकीन भाई आदींनी प्रयत्न केलेत. प्रास्ताविक सुधाकर राऊत, संचालन चरण सोनारे, आभार मो. सलीम यांनी मानले.(तालुका प्रतिनिधी)