पीएम आवासच्या कारभाराविरुद्ध गाढव मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2021 05:00 AM2021-10-31T05:00:00+5:302021-10-31T05:00:55+5:30

जिल्हा ग्रामीण यंत्रणा कार्यालयावर मोर्चाने धडक देत विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. यात लाभार्थ्यांना घर उभारताना अनेक आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. ग्रामीण भागातील  बहुतांश लाभार्थी हे शेतकरी असून, निसर्गाच्या लहरीपणामुळे व ऐन हंगामात शेतमालाचे भाव पाडल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहेत. घरकूल योजनेत केंद्र सरकारने लागू केलेल्या जाचक अटी या लाभार्थ्यांना नाहक त्रासाला कारणीभूत आहेत.

Donkey Morcha against the management of PM Awas | पीएम आवासच्या कारभाराविरुद्ध गाढव मोर्चा

पीएम आवासच्या कारभाराविरुद्ध गाढव मोर्चा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : केंद्र सरकारच्या पंतप्रधान आवास योजनेच्या गलथान कारभाराने सामान्य नागरिक त्रस्त झाला आहे. अनावश्यक प्रशासकीय त्रास सुरू असून, घरकूल लाभार्थींना धनादेश रक्कम देताना ‘मस्टर’ची अट लादल्याने हैराण झाले आहे. या योजनेत पारदर्शकता यावी आणि नागरिकांना दिलासा मिळावा, या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवारी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने गाढव मोर्चा काढण्यात आला.
जिल्हा ग्रामीण यंत्रणा कार्यालयावर मोर्चाने धडक देत विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. यात लाभार्थ्यांना घर उभारताना अनेक आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. ग्रामीण भागातील  बहुतांश लाभार्थी हे शेतकरी असून, निसर्गाच्या लहरीपणामुळे व ऐन हंगामात शेतमालाचे भाव पाडल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहेत. घरकूल योजनेत केंद्र सरकारने लागू केलेल्या जाचक अटी या लाभार्थ्यांना नाहक त्रासाला कारणीभूत आहेत. त्या अनुषंगाने राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुशील गावंडे व शहराध्यक्ष नीलेश शर्मा यांच्या नेतृत्वात मोर्चाचे आयोजन करण्यात आले. गाढव मोर्चा बस स्टँड ते जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, मालटेकडी कार्यालय येथे पोहचला तेथे प्रकल्प अधिकारी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांना केंद्र सरकारच्या पंतप्रधान आवास योजने अंतर्गत येणाऱ्या घरकूल  लाभार्थ्यांच्या समस्या मांडल्या. 
यावेळी सुशील गावंडे, नीलेश शर्मा, गजानन रेवाळकर, विपीन शिंगणे, साहिल सोलीव, प्रफुल्ल सानप, कुणाल विधळे, अनिरुद्ध होले, शैलेश राऊत, प्रतीक भोकरे, मंगेश पोल्हाड, अजित काळबांडे,  राजू येरहोकर, हेमंत बोबडे, शुभम पारोदे, दिग्विजय गायगोले, नितीन गावंडे, श्रीकांत तेलंग, कुणाल ठाकूर, निरंजन खडसे, वैभव तायडे, वैभव शिंदे, जावेद शेख, वैभव ठाकरे आदी उपस्थित होते.

 

Web Title: Donkey Morcha against the management of PM Awas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.