गाढवांनाही पुरणपोळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2019 11:40 PM2019-08-31T23:40:13+5:302019-08-31T23:42:18+5:30

बैल पोळ्याला शेतकऱ्यांमध्ये जसे बैलाला महत्त्व अगदी, त्याचप्रमाणे गाढव पाळणाऱ्यांमध्ये या गाढवांना महत्त्व. तोच उत्साह आणि तीच प्रथाही जोपासण्यात आली. पोळ्याच्या दिवशी या गाढवांना आंघोळ घातली गेली. आंघोळीनंतर वेगवेगळ्या रंगात त्यांना रंगविले गेले. गाढवं सुंदर दिसावीत, यासाठी त्यांना कल्पकतेने रंगवण्याकडे त्यांचा कल होता. रंगवलेल्या गाढवांच्या गळ्यात फुलांच्या, मण्यांच्या, घुंगराच्या माळा घातल्या गेल्यात.

Donkeys also Sweets | गाढवांनाही पुरणपोळी

गाढवांनाही पुरणपोळी

Next
ठळक मुद्देपरंपरा । कामकरी गाढवांप्रति कृतज्ञता पथ्रोट येथे गाढवांचा पोळा

अनिल कडू ।
लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : बैल पोळ्याच्या दिवशी अचलपूर, हरम, खानजमानगर, आकोट, अंजनगाव येथे गाढवांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखविला गेला. त्यांचे पूजन करण्यात आले. त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त केली गेली.
बैल पोळ्याला शेतकऱ्यांमध्ये जसे बैलाला महत्त्व अगदी, त्याचप्रमाणे गाढव पाळणाऱ्यांमध्ये या गाढवांना महत्त्व. तोच उत्साह आणि तीच प्रथाही जोपासण्यात आली. पोळ्याच्या दिवशी या गाढवांना आंघोळ घातली गेली. आंघोळीनंतर वेगवेगळ्या रंगात त्यांना रंगविले गेले. गाढवं सुंदर दिसावीत, यासाठी त्यांना कल्पकतेने रंगवण्याकडे त्यांचा कल होता. रंगवलेल्या गाढवांच्या गळ्यात फुलांच्या, मण्यांच्या, घुंगराच्या माळा घातल्या गेल्यात. जमेल ते अलंकार त्यांना चढविले गेले. हे करत असताना गाढवं पाळणाऱ्यांमध्ये कमालीचा उत्साह दिसत होता. सजवलेल्या गाढवांचे औक्षण केले गेले. गुलाल लावण्यात आला आणि पूजनानंतर त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून त्यांच्यापुढे नतमस्तक होत कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. यादरम्यान दीड दिवस त्यांच्याकडून कुठलेही काम करवून घेतले गेले नाही. अचलपूर, हरम, खानजमानगर, आकोट, अंजनगाव येथेही याप्रकारे गाढवांचे पूजन झाले. पुरणपोळी खाऊ घालून त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त केली गेली.
आकोटमध्ये पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी रामटेकपुऱ्यात पिंपळाच्या झाडाजवळ हा गाढवांचा पोळा भरतो. देऊळगाव राजाला गाढवांचा बाजार भरतो. गाढवांचे व्यापारीही त्यांना घेऊन विक्रीकरिता फिरस्तीवर असतात. या बाजारातील व्यापाºयांकडील गाढवं पाळणाऱ्यांनी विकत घेतली आहेत. हरम, खांजमानगर, अचलपूर येथूनही गाढवांची पिले विकत घेऊन त्यांचे संगोपन करणारे बऱ्यापैकी आहेत.

अचलपूरमध्ये हजारांवर गाढव आहेत. अचलपुरात पोळा भरत नसला तरी बैल पोळ्याच्या दिवशी आम्ही त्यांना आंघोळ घालतो. रंगवतो, सजवतो, त्यांचे पूजन करून पुरणपोळीचा नैवेद्य त्यांना भरवतो.
- प्रदीप बावणे, अचलपूर.

Web Title: Donkeys also Sweets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.