अनोळखी माणसाला मोबाईल देऊ नका, क्षणात बॅंकखाते होऊ शकते साफ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:16 AM2021-08-21T04:16:40+5:302021-08-21T04:16:40+5:30
असाईनमेंट पान २ ची लिड अमरावती : अनोळखी माणसाने कॉल लावण्यासाठी मोबाईल मागितल्यास देऊ नका. कारण त्यातून फसवणुकीचे ...
असाईनमेंट पान २ ची लिड
अमरावती : अनोळखी माणसाने कॉल लावण्यासाठी मोबाईल मागितल्यास देऊ नका. कारण त्यातून फसवणुकीचे प्रकार वाढू लागले आहेत. काॅलसाठी दिलेल्या मोबाईलच्या माध्यमातून आपल्या बॅंक खात्यातील रक्कम एका क्षणात नाहीशी अर्थात विड्रॉल केली जाऊ शकते. अशा फसवणुकीच्या घटनादेखील घडत आहेत. त्यामुळे अनोळखी माणसाला मोबाईल देऊ नका, क्षणात बॅंक खाते होऊ शकते साफ, असे आवाहन सायबर पोलीस करीत आहेत.
ओटीपी मिळविण्यासाठी अशी केली जाऊ शकते फसवणूक
कॉल करण्यासाठी मोबाईल घेऊन : भाऊ, माझा मोबाईल डिस्चार्ज झालाय, अर्जंट कॉल करायचा, असे सांगून तुमचा मोबाईल घेतला जाऊ शकतो.
वेगळी लिंक पाठवून
कॉलसाठी मोबाईल देण्याची विनंती करून क्षणात तुमच्या मोबाईलमध्ये लिंक पाठवून, ती ओपन करून ओटीपी मिळवून फसवणूक केली जाऊ शकते.
लॉटरी लागली आहे असे सांगून
लॉटरी लागली आहे, असे सांगूनदेखील मोबाईल घेतला जाऊ शकतो. लाॅटरी लागल्याची बतावणी करून ऑनलाईन फ्रॉडच्या घटना वाढल्या आहेत.
केवायसीसाठी आवश्यक आहे म्हणून
तुमचे बॅंक खाते आधारशी संलग्न नसल्याने केवायसी करायचे आहे, त्यासाठी लिंक पाठवून, त्यावर क्लिक करण्याचे सुचवून ओटीपी मागितला जाऊ शकतो.
ही घ्या काळजी
१) आपला मोबाईल अनोळखी व्यक्तिला देऊ नये. भरीस पडू नये अन् दिलाच तर तो नेमका काय करतो आहे, ते तपासा.
२) कुणाशीही ओटीपी शेअर करू नका. कॉलव्यतिरिक्त अन्य ॲप अनोळखी व्यक्तिला हाताळण्यास देऊ नका.
३) आपला ओटीपी कुठलीही बॅंक मागत नाही. त्यामुळे केवायसी, लॉटरी, रिवाॅर्ड लागल्याच्या भूलथापांना बळी पडू नका. सतर्क राहा.
ओटीपी शेअर करू नकाच
अनोळखी माणसाला मोबाईल देऊच नका. एखादवेळी माणुसकी म्हणून मोबाईल दिल्यास, तो कॉलव्यतिरिक्त आणखी काही करत तर नाही ना, याबाबत सावध राहा. ओटीपी मागून, क्युआर कोड स्कॅन करून ऑनलाईन फ्रॉडचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत.
सीमा दाताळकर, पोलीस निरीक्षक,
सायबर पोलीस ठाणे