सणउत्सावात बाहेर पडू नको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:13 AM2021-04-13T04:13:10+5:302021-04-13T04:13:10+5:30
अमरावती : गुडीपाडवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, महावीर जयंती, रामनवमी व रमजान ईद आदी सणउत्सवात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू ...
अमरावती : गुडीपाडवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, महावीर जयंती, रामनवमी व रमजान ईद आदी सणउत्सवात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी गर्दी टाळावी आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी हिस्ट्रीसिटर आणि रेकॉर्डधारी गुन्हेगारांवर कारवाई करा, असे निर्देश पोलिस आयुक्त आरती सिंह यांनी सोमवारी गुन्हेविषयक बैठकीत अधिकाऱ्यांना दिले. त्यामुळे आगामी सण-उत्सवात पोलिसांचा गुन्हेगारांवर वॉच राहणार आहे.
पोलीस आयुक्तालयात सीपींनी गुन्हेविषयक बैठक घेतली. यावेळी पोलीस उपायुक्त शशीकांत सातव, विक्रम साळी यांच्यासह १० पोलीस ठाण्यांचे ठाणेदार, सायबर, वाहतूक, गुन्हे शाखेसह आर्थिक गुन्हे शाखेचे अधिकारी उपस्थित होते. स्लम एरियात अवैध दारू विक्री होत आहे. त्यामुळे अवैध दारूवर कारवाई करण्याचे आदेश सीपी आरती सिंह यांनी दिले. यासोबत प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करा आणि प्रतिबंधक कारवाईवर जोर द्या, असे दिशानिर्देश सीपींनी अधिकाऱ्यांना दिले.
बॉक्स
गुन्हे शाखेचा सत्कार
गुन्हे शाखेच्या पोलिसांनी नागपुरी गेट हद्दीत पाच आरोपींना अटक करून, त्यांच्याकडून सहा देशी कट्टे व २६ काडतूस जप्त केले होते. इकबाल कॉलनीत दोन बेवारस कारमधून ३७६ किलोचा गांजा जप्त केला होता. या दोन्ही कारवाईची दखल घेत सीपींनी गुन्हे शाखेच्या पोलिसांना सन्मानपत्र देऊन गौरव केला.