कोरोना लसीच्या डोसचे कॉकटेल नकोच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:10 AM2021-05-31T04:10:14+5:302021-05-31T04:10:14+5:30
अमरावती : सद्यस्थितीत लसीकरणासाठी लसींचा पुरेसा पुरवठा होत नाही. त्यामुळे अनेकांना पहिल्या व दुसऱ्या डोसची प्रतीक्षा करावी लागत आहे. ...
अमरावती : सद्यस्थितीत लसीकरणासाठी लसींचा पुरेसा पुरवठा होत नाही. त्यामुळे अनेकांना पहिल्या व दुसऱ्या डोसची प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे एक डोस एका लसीचा व दुसरा डोस दुसऱ्या लसीचा असे केल्यास काय होणार, असे अनेक प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे. मात्र, शरीराची रोगप्रतिकार क्षमता योग्य राहण्यासाठी दोन्ही डोस एकाच लसीचे हवेत, असे डाॅक्टरांनी स्पष्ट केले आहे.
याबाबत ट्रायल सुरू आहे. मात्र, अद्याप कोणतेही नित्कर्ष बाहेर आलेले नाही. राज्याच्या आरोग्य विभागाद्वारा याविषयी काही सूचना नसल्याचेही या डॉक्टरांनी सांगितले. लसीकरणासाठी कोविशिल्ड अधिक, तर कोव्हॅक्सिनचा कमी प्रमाणात पुरवठा होत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २,३६,६६१ व्यक्तींना दुसऱ्या डोसची प्रतीक्षा आहे.
आता कोविशिल्ड या लसीच्या दोन डोसमधील अंतर ८४ दिवसांपर्यंत वाढविण्यात आलेले आहे. याशिवाय लसीच्या तुटवड्यामुळे १८ ते ४४ या वयोगटातील व्यक्तींचे लसीकरण थांबविण्यात आलेले आहे. विशेष: कोव्हॅक्सीनचे कमी डोस प्राप्त होत असल्यामुळे अनेक नागरिकांना दुसऱ्या डोससाठी उशीर लागत आहे. त्यामुळे लसीकरणाबाबत नागरिकांचे अनेक प्रश्न समोर येत आहेत. यात दुसऱ्या डोससाठी विलंब होत असल्याबाबत जास्त प्रश्न आहेत. मात्र, ज्या नागरिकांनी पहिली लस जी घेतली त्यांनी दुसरी लस तीच घ्यावी, असे डॉक्टरांनी सांगितले.
पाईंटर
एकूण लसीकरण
पहिला डोस ३,४२,५४८. दुसरा डोस १,०५,९०७
४५ ते ६०
पहिला डोस १,३०,३१५, दुसरा डोस २७,३८२
१८ ते ४४
पहिला डोस १८,३५३, दुसरा डोस ०७
बॉक्स
लसींचा तुटवडा
* १८ ते ४४ दरम्यान १२.०५ लाख नागरिक आहेत. यापैकी १८,३६० नागरिकांनीच लसीचा पहिला डोस घेतला, दुसरा फक्त सात जणांनाच देण्यात आलेला आहे.
* आतापर्यंत ४,४०,४२० डोज जिल्ह्यास प्राप्त झालेले आहे. यात कोविशिल्डचे ३,५८,२३० व कोव्हॅक्सिनचे ८४,४९० डोस प्राप्त झाल्याचे आरोग्य यंत्रणेनी सांगितले.
कोट
तज्ज्ञ डॉक्टर्स काय म्हणतात?
शरीरात प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी ज्या लसीचा पहिला डोस घेतला, त्याच लसीचा दुसरा डोस घेणे महत्त्वाचे आहे. पहिला त्सज वेगळा आणी दुसरा वेगळा असे करता येणार नाही.
- डाॅ. दिलीप रणमले,
जिल्हा आरोग्य अधिकारी
कोट
प्रत्येक लसीची पररिणामकारकता वेगळी आहे. त्यामुळे ज्यांनी ज्या लसीचा पहिला डोस घेतला त्यांनी त्याच लसीचा दुसरा डोस घेणे महत्त्वाचे आहे. सरमिसळ झाल्यास परिणाम साध्य होणार नाही.
- डॉ श्यामसुंदर निकम,
जिल्हा शल्य चिकित्सक
कोट
नियमानुसार दोन वेगवेगळे डोस घेता येणार नाही. यासंदर्भात अद्याप गाईडलाईन नाही. असा प्रयोग कोणी करू नयेत, यामुळे प्रतिकारक्षमतेवर काय परिणाम होईल, याविषयी निश्चित सांगता येणार नाही.
- डॉ विशाल काळे,
एमओएच, महापालिका