विद्यापीठात ‘डॉटकॉम इन्फोटेक’चे ५० लाखांच्या देयकांसाठी ‘फिल्डिंग’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:13 AM2021-03-24T04:13:22+5:302021-03-24T04:13:22+5:30

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या संपूर्ण विभागाचे डिजिटायझेशन करण्यासाठी सन २०१७ मध्ये ‘डॉटकॉम इन्फोटेक’ या कंपनीकडे जबाबदारी सोपविण्यात ...

Dotcom Infotech fielding for Rs 50 lakh payments at university | विद्यापीठात ‘डॉटकॉम इन्फोटेक’चे ५० लाखांच्या देयकांसाठी ‘फिल्डिंग’

विद्यापीठात ‘डॉटकॉम इन्फोटेक’चे ५० लाखांच्या देयकांसाठी ‘फिल्डिंग’

Next

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या संपूर्ण विभागाचे डिजिटायझेशन करण्यासाठी सन २०१७ मध्ये ‘डॉटकॉम इन्फोटेक’ या कंपनीकडे जबाबदारी सोपविण्यात आली. मात्र, डिजिटायझेशनचे कामे अपूर्ण आणि देयकांप्रकरणी गठित चौकशी समितीचा अहवाल अप्राप्त असताना, आता ‘मार्च एन्डिंग’च्या नावे ५० लाखांचे देयकांसाठी ‘फिल्डिंग’ लावली आहे. विशेषत: कुलगुरू मुरलीधर चांदेकर हे सुटीवर असताना त्यांच्या अनुपस्थितीत देयके काढण्याचा डाव रचला जात आहे.

विद्यापीठात वित्त व लेखा, अंकेक्षण, परीक्षा विभाग, सामान्य प्रशासन, पीएच.डी. सेल, गाेपनीय, नामांकन अशा एकूण सर्वच विभागांचे कामकाज ऑनलाईन व्हावे, यासाठी डिजिटायझेशनची जबाबदारी डॉटकॉम इन्फोटेककडे सोपविण्यात आली.

आतापर्यंत डॉटकॉम इन्फोटेकला डिजिटायझेशन कामापोटी २२ लाख रुपये अदा करण्यात आले आहेत. मध्यंतरी देयके अदा केल्याप्रकरणी चौकशी समिती गठित झाली. अहवाल अप्राप्त झाला अथवा नाही, हे गुपित आहे. मात्र, आता डॉटकॉम इन्फोटेकने थकीत ५० लाखांची देयके मिळण्यासाठी फिल्डिंग लावली आहे. मार्च एन्डिंगच्या नावे त्वरित देयके काढण्यासाठी वित्त व लेखा विभागात फाईल वेगाने फिरत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

विद्यापीठाने डॉटकॉम इन्फोटेकला डिजिटायझेशनची कामे सोपविताना २८ मॉड्युलपैकी सर्वांत महत्त्वाच्या फायनान्स अँड अकाऊंटिंग मॅनेजमेंट या मॉड्युलचे काम अपूर्णच असल्याची माहिती आहे. त्यावर गठित चौकशी समितीने बोटदेखील ठेवले. विद्यापीठाने २२ नोव्हेंबर २०१९ रोजी डब्ल्यूआययूएमएसच्या अंकेक्षण विभागाशी संबंधित समस्याविषयी डॉटकॉम इन्फोटेकला कुलसचिवांच्या सूचनेनुसार नोटीस बजावली.

------------

बॉक्स

मास्टर माईंड कोण? जोरदार चर्चा

विद्यापीठात डॉटकॉम इन्फोटेकने डिजिटायझेशन वेळेत आणि अचूक केले नाही. सॉफ्टवेअर पूर्णपणे विकसित नसताना, उर्वरित ५० लाखांचे देयके अदा करण्यासाठी एका बड्या अधिकाऱ्याने फिल्डिंग लावल्याची माहिती आहे. त्यामुळे डॉटकॉम इन्फोटेकचा मास्टर माईंड कोण, याविषयीची मंगळवारी जोरदार चर्चा रंगली. हा मुद्दा सन २०१९ मध्ये सिनेटमध्ये गाजला, हे विशेष.

---------------------

कोट

- एफ.सी. रघुवंशी, अधिष्ठाता तथा प्रभारी कुलगुरू.

Web Title: Dotcom Infotech fielding for Rs 50 lakh payments at university

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.