रुग्ण दुपटीचा कालावधी ५४ दिवसांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:09 AM2021-06-06T04:09:48+5:302021-06-06T04:09:48+5:30

--------------------- पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण अमरावती : जागतिक पर्यावरण दिननिमित्त महापौर, उपमहापौर, स्थायी समितीचे सभापती, आयुक्त व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत ...

Double duration of patient at 54 days | रुग्ण दुपटीचा कालावधी ५४ दिवसांवर

रुग्ण दुपटीचा कालावधी ५४ दिवसांवर

Next

---------------------

पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण

अमरावती : जागतिक पर्यावरण दिननिमित्त महापौर, उपमहापौर, स्थायी समितीचे सभापती, आयुक्त व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत रहाटगाव येथील स्मशानभूमीत वृक्षारोपण करण्यात आले.

-------------------

शहरात ठिकठिकाणी पर्यावरण दिन

अमरावती : जागतिक पर्यावरण दिननिमित्त शहरात सामाजिक संस्थांद्वारा ठिकठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. याशिवाय अनेक संस्थांद्वारा नागरिकांना वृक्ष भेट देण्यात आलेले आहे.

----------------------

८ जूनपर्यत तुरळक पावसाची शक्यता

अमरावती : हवामानशास्त्रीय बदलामुळे जिल्ह्यात ८ जूनपर्यत तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी वादळासह पावसाची शक्यता असल्याचे हवामानतज्ज्ञ अनिल बंड यांनी वर्तविली.

-----------------------

१५ जूनपर्यंत पेरणी नकोच

अमरावती : जिल्ह्यात जोपर्यंत १०० मिमी पाऊस होत नाही तोवर व १५ जूनच्या पश्चात पेरणी करण्याचा सल्ला कृषी विभागाद्वारा देण्यात आलेला आहे. अन्यथा पिकाला मोड येण्याची शक्यता आहे.

------------------------

महापालिकेच्या पथकाद्वारा सक्तीने कोरोना चाचणी

अमरावती : महापालिकेच्या पथकाद्वारा वेलकम पाईंटवर सक्तीने कोरोना चाचणी करण्यात येत आहे. यासाठी काही कर्मचारी हातात दंडुका घेऊन रस्त्यात उभे राहतात. कोरोना चाचणीची नागरिकांना सक्ती केलेली आहे.

-------------------

महावितरणद्वारा तोडलेल्या फांद्या पडून

अमरावती : वीज तारांच्या आड येणाऱ्या झाडांच्या फांद्या महावितरणचे कर्मचाऱ्यांद्वारा तोडण्यात आल्या. मात्र, त्या अजूनही उचलल्या नसल्याने रस्त्यावर ठिकठिकाणी पडून आहेत. तातडीने उचलण्याची नागरिकांची मागणी आहे.

Web Title: Double duration of patient at 54 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.