दुपटीचे आमिष; ४४ हजार गमावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:19 AM2021-08-17T04:19:00+5:302021-08-17T04:19:00+5:30

गेम एशिया ऑनलाईन कंपनीत ४४ हजार रुपये गुंतविल्यास दरमहा १५ टक्केप्रमाणे १३ महिन्यात प्रत्येकी ६,६०० रुपये परत देण्यात येतील. ...

Double lure; 44,000 lost | दुपटीचे आमिष; ४४ हजार गमावले

दुपटीचे आमिष; ४४ हजार गमावले

googlenewsNext

गेम एशिया ऑनलाईन कंपनीत ४४ हजार रुपये गुंतविल्यास दरमहा १५ टक्केप्रमाणे १३ महिन्यात प्रत्येकी ६,६०० रुपये परत देण्यात येतील. १३ महिन्यात ४४ हजारांच्या मोबदल्यात ८५ हजारांहून अधिक रक्कम परतावा म्हणून दिली जाईल, असे आश्वासन कंपनीच्या संचालक व एजंटने दिले. सबब, निखिल वानखडे यांनी इर्विन चौक स्थित एका बँकेतील कंपनीच्या खात्यात ४४ हजार रुपये भरले. मात्र, आठ दहा महिन्यानंतरही ६,६०० रुपयांप्रमाणे रक्कम परत न मिळाल्याने वानखडे यांनी कंपनीची चौकशी केली. मात्र, कंपनी बंद झाल्याची माहिती त्यांना मिळाली. आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात येताच वानखडे यांनी शहर कोतवाली गाठून तक्रार नोंदविली. पोलिसांनी कंपनीच्या संचालकासह एजंट अशा तिघांविरूद्ध गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक राजेंद्र उमक करीत आहे.

Web Title: Double lure; 44,000 lost

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.