रुग्ण दुपटीचे प्रमाण ३२ दिवसांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:13 AM2021-03-25T04:13:57+5:302021-03-25T04:13:57+5:30
अमरावती : कोरोनाचा वाढता संसर्ग आता धोक्याच्या वळणावर आलेला आहे. १ फेब्रुवारीला २६६ दिवसांवर असलेले रुग्ण दुपटीचा कालावधी आता ...
अमरावती : कोरोनाचा वाढता संसर्ग आता धोक्याच्या वळणावर आलेला आहे. १ फेब्रुवारीला २६६ दिवसांवर असलेले रुग्ण दुपटीचा कालावधी आता ३२.५ दिवसांवर आल्याने जिल्हा व आरोग्य प्रशासनाचे ठोके वाढले आहे.
जिल्हात १ फेब्रुवारीपासून कोरोनाचा संसर्ग चांगलाच वाढला आहे. यावेळी २६,६०१ कोरोनाग्रस्त व रुग्ण दुपटीचा कालावधी २६६.०१ दिवसांवर होता. त्यानंतर सातत्याने रुग्णसंख्येत वाढ होत आलेली आहे. १५ फेब्रुवारीला २६,२२८ रुग्ण व डबलिंग रेट २६६ दिवस. २५ फेब्रुवारीला ३२,८३१ रुग्ण व डबलिंग रेट १०५ दिवसांवर पोहोचला. या महिन्यात १५ हजारांवर कोरोना रुग्ण वाढल्याने १ मार्चला ३६,४५२ व रुग्ण दुपटीचा कालावधी १०५ दिवसांवर होता.
कोरोना रुग्णांचा संसर्ग वाढताच असल्याने ३ मार्चला ३७,१२३ कोरोनाग्रस्तांची नोंद झाली व रुग्ण दुपटीचा कालावधी धोक्याचे वळणावर म्हणजेच ३७ दिवसांवर पोहोचला. १३ मार्चला ४२,११४ रुग्णांची नोंद झाली व रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी वर्षभरात सर्वात कमी म्हणजे २१ दिवसांवर आलेला होता. मात्रं चाचण्यांमध्ये पॉझिटिव्हिटी कमी झाल्याने या अठवड्यात रुग्णसंख्येत थोडी कमी व डबलिंग रेटमध्ये ९ दिवसांनी सुधार आला व आता २३ मार्चला जिल्ह्यात ४६,२५४ रुग्णांची नोंद झाली व रुग्ण दुपटीचा कालावधी ३२.५ दिवसांवर पोहोचल्याने जिल्हा प्रशासनावर ताण वाढलेला आहे व डबलिंग रेटमध्ये कमी येणे हे आगामी काळासाठी धोक्याची घंटा आहे.
पाईंटर
दिवस डबलिंग रेट
१ फेब्रुवारी : २६६
२५ फेब्रुवारी : १०५
३ मार्च : ४२
६ मार्च : २१
१४ मार्च : ३१
२३ मार्च : ३२.५
बॉक्स
रॅन्डम चाचण्यांमध्ये तीन पेक्षा अधिक पॉझिटिव्ह
जिल्ह्यात रविवारीपार पडलेल्या राज्य सेवा पूर्वपरीक्षेकरिता विविध विभागाचे ११०० अधिकारी व कर्मचारी याकरिता नियुक्त करण्यात आले होते व या सर्वांची आरटी-पीसीआर चाचणी १९ मार्चपर्यंत करण्यात आली. यात ३५ कर्मचारी पॉझिटिव्ह आलेले आहेत. या सर्व चाचण्या एक रॅण्डम सर्व्हेक्षण गृहीत धरल्यास किमान ३.१८ टक्के नागरिक पॉझिटिव्ह आलेले आहेत व असिम्पटोमॅटिक असणाऱ्या या रुग्णांकडून संसर्ग होत असल्याचे वास्तव आहे.
बॉक्स
पुन्हा हनुवटीवर आले मास्क
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढता असताना पथकांच्या कारवाया थंडावल्याने नागरिकांचे मास्क चेहऱ्याऐवजी हनुवटीवर आले आहे. चौकाचौकांतील पथक गायब झालेले आहेत. नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक पंचसूत्रीचा विसर पडला आहे. फक्त शासकीय व निमशासकीय कार्यालयातील कर्मचारीसंख्या कमी झाली. दुसरीकडे दुकानात फिजिकल डिस्टन्सचा विसर पडला आहे. रस्ते पुन्हा गर्दींनी फुलले व कोरोनाचा पुन्हा विसर पडत असल्याचे दिसून येत आहे.