लॉकडाऊन वक्तृत्व स्पर्धेत कणक बैस प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:13 AM2021-03-08T04:13:30+5:302021-03-08T04:13:30+5:30

नांदगाव पेठ : सप्तरंग क्रीडा व शिक्षण मंडळ आणि नांदगांव पेठ विकास मंचच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय लॉकडाऊन वक्तृत्व ...

Dough bass first in lockdown oratory competition | लॉकडाऊन वक्तृत्व स्पर्धेत कणक बैस प्रथम

लॉकडाऊन वक्तृत्व स्पर्धेत कणक बैस प्रथम

Next

नांदगाव पेठ : सप्तरंग क्रीडा व शिक्षण मंडळ आणि नांदगांव पेठ विकास मंचच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय लॉकडाऊन वक्तृत्व स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर झाला. यामध्ये हॉलिक्रॉस मराठी हायस्कूलची इयत्ता नववीची विद्यार्थिनी कणक शशिसिंह बैस हिने प्रथम येण्याचा बहुमान पटकविला. घाटलाडकी येथील इयत्ता तिसरीची विद्यार्थिनी वेदांती सतीश राजस हिने दुसराए तर समर्थ हायस्कूची इयत्ता नववीची विद्यार्थिनी धनश्री गोवर्धन चिंचोळकर हिने तिसरा क्रमांक पटकावला.

युगा संजय झगडे, प्रिया प्रदीप खेरडे, तनुजा प्रदीप इंगोले, स्वरा कांबळे व सर्वज्ञ विजय ढाकूलकर या विद्यार्थ्यांनी प्रोत्साहनपर बक्षीस प्राप्त केले. जिल्हाभरातून ११२ विद्यार्थ्यांनी या ऑनलाइन स्पर्धेत सहभाग घेतला होता. स्पर्धेचे परीक्षण सहायक शिक्षिका वैशाली गरकल व प्रफुल्ल घवळे यांनी केले. विजेत्या स्पर्धकाला १००१ रुपये रोख व प्रमाणपत्र, द्वितीय स्थानासाठी ७०१ रुपये व प्रमाणपत्र आणि तिसऱ्या स्थानासाठी ५०१ रुपये व प्रमाणपत्र तसेच प्रोत्साहनपर बक्षीस २०१ रुपये व प्रमाणपत्र असे आहे.

Web Title: Dough bass first in lockdown oratory competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.