नाभिक व्यवसायावर आली उतरती कळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:15 AM2021-04-28T04:15:20+5:302021-04-28T04:15:20+5:30
यामुळे सर्वसामान्यांच्या लघुउद्योगामध्ये मोठे संकट आले आहे. त्यामध्ये नाभिक व्यवसायाला उतरती कळा आली असल्याचे चित्र तालुक्यात दिसून येत आहे. ...
यामुळे सर्वसामान्यांच्या लघुउद्योगामध्ये मोठे संकट आले आहे. त्यामध्ये नाभिक व्यवसायाला उतरती कळा आली असल्याचे चित्र तालुक्यात दिसून येत आहे. पारंपरिक व्यवसाय असल्याने संसाराचा गाडा कसा चालवावा या विचारात व्यावसायिक असल्याचे एका व्यावसायिकाने त्या वेळी सांगितले.
धामणगाव रेल्वे तालुक्यात नाभिक समाजाची लोकसंख्या बऱ्यापैकी आहे. त्यांचा प्रामुख्याने व्यवसाय म्हणजे केश कर्तनालय आहे. याच व्यवसायात जमवलेली तुळशीमधून दुकाने थाटली गेली. आतापर्यंत संसाराचा गाडा याच व्यवसायावर सुरू होता; परंतु गेल्या एक वर्षापासून या व्यवसायाला उतरती कळा आल्याने अनेक व्यावसायिकांनी दुसरा रोजगार शोधल्याचे एकंदरीत चित्र ग्रामीण भागात प्रामुख्याने दिसते.
मागील वर्षी कोरोनाो आगमन केल्याने गेले चार ते पाच महिने दुकाने बंद ठेवावी लागली. आताही तोच प्रकार पुढे आल्याने जगावे कसे हा मोठा प्रश्न भेडसावत असल्याचे समजते.
नाभिक समाजातील बहुतांश शहरी कुटुंबे ही केवळ आपल्या उद्योगाच्या भरोशावर जगतात. या समाजाकडे काही प्रमाणात जमीन असली तरी बरीचशी कुटुंबे भूमिहीन आहेत. त्यामुळे केवळ केशकर्तन करून ती आपल्या संसाराचा गाडा चालवतात; परंतु सारखे लॉकडाऊन आल्याने अनेकांनी दुसरा रोजगार केला असला तरी त्या रोजगारावरही बंदी आल्याने आता काय करावे हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला असल्याचे जाणवते.