डॉ. अविनाश आवलगावकर मराठी भाषा विद्यापीठाचे पहिले कुलगुरू

By प्रदीप भाकरे | Published: September 4, 2024 01:14 PM2024-09-04T13:14:39+5:302024-09-04T13:15:28+5:30

पहिल्या वहिल्या कुलसचिवांचीही नियुक्ती : रिध्दपुरला साकारत आहे ज्ञानपीठ

Dr. Avinash Avalgaonkar was the first Vice-Chancellor of Marathi Language University | डॉ. अविनाश आवलगावकर मराठी भाषा विद्यापीठाचे पहिले कुलगुरू

Dr. Avinash Avalgaonkar was the first Vice-Chancellor of Marathi Language University

प्रदीप भाकरे
अमरावती :
मराठी भाषा विद्यापीठ, रिद्धपूर या विद्यापीठाचे प्रथम कुलगुरु म्हणून डॉ. अविनाश आवलगावकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सोबतच, सह संचालक, उच्च शिक्षण, अमरावती विभाग, अमरावती यांची मराठी भाषा विद्यापीठ, रिद्धपूर, अमरावती विद्यापीठाचे प्रथम कुलसचिव म्हणून नियुक्ती झाली आहे. महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने ३ सप्टेंबर रोजी त्याबाबत दोन स्वतंत्र आदेश काढले आहेत. रिद्धपूर येथे हे विद्यापीठ उभारण्यात येत आहे. रिद्धपूर हे महानुभव पंथाचे प्रमुख केंद्र असून मराठी साहित्याच्या विकासात या ठिकाणाचे महत्त्वाचे योगदान आहे. रिद्धपूरचे हे महत्व लक्षात घेऊन या ठिकाणी मराठी भाषा विद्यापीठाची

आदेशानुसार, मराठी भाषा विद्यापीठ अधिनियम, २०२३ मधील कलम ८७ नुसार प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन महाराष्ट्र शासन याद्वारे डॉ. अविनाश आवलगावकर यांची मराठी भाषा विद्यापीठ, रिद्धपूर, अमरावती विद्यापीठाचे प्रथम कुलगुरु म्हणून नियुक्ती करीत आहे. डॉ. अविनाश आवलगावकर यांची कुलगुरु पदावरील नियुक्ती, ते विद्यापीठाच्या प्रथम कुलगुरु पदाचा पदभार ज्या दिनांकाला स्विकारतील त्या दिनांकापासून एक वर्षाच्या कालावधीसाठी किंवा कुलपतीद्वारे कुलगुरुंची नियमित नियुक्ती केली जाईपर्यंत या पैकी जो अवधी अगोदर पूर्ण होईल तोपर्यंत करण्यात येत असल्याचे आदेशात नमूद आहे.
             

तर, सह संचालक, उच्च शिक्षण, अमरावती विभाग, अमरावती यांची कुलसचिव पदावरील नियुक्ती, ते विद्यापीठाच्या प्रथम कुलसचिव पदाचा पदभार ज्या दिनांकाला स्विकारतील त्या दिनांकापासून एक वर्षाच्या कालावधीसाठी किंवा अधिनियमातील तरतूदीनुसार कुलसचिवाची नियमित नियुक्ती केली जाईपर्यंत या पैकी जो अवधी अगोदर पूर्ण होईल तोपर्यंत करण्यात येत असल्याचेदेखील महाराष्ट्र शासनाचे उपसचिव प्रताप लुबाळ यांच्या स्वाक्षरीने काढण्यात आलेल्या आदेशात म्हटले आहे.

Web Title: Dr. Avinash Avalgaonkar was the first Vice-Chancellor of Marathi Language University

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.