डॉ. बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त स्पर्धा

By admin | Published: January 25, 2016 12:22 AM2016-01-25T00:22:14+5:302016-01-25T00:22:14+5:30

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती निमित्ताने महापालिका क्षेत्रातील पदवी ते पदव्युत्तर विद्यार्थ्यांनाही ३ एप्रिल रोजी २०० मार्कची परीक्षा घेण्यात येईल...

Dr. Competition for Babasaheb's birth anniversary | डॉ. बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त स्पर्धा

डॉ. बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त स्पर्धा

Next

आयुक्त गुडेवार : १४ एप्रिल रोजी बक्षीस वितरण
अमरावती : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती निमित्ताने महापालिका क्षेत्रातील पदवी ते पदव्युत्तर विद्यार्थ्यांनाही ३ एप्रिल रोजी २०० मार्कची परीक्षा घेण्यात येईल व स्पर्धेचे बक्षीस वितरण १४ एप्रिल रोजी करण्यात येईल, असे महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी शनिवारी सांगितले.
महापालिकेच्यावतीने भारतीय राज्य घटना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनचरित्र व त्यांची ग्रंथसंपदा या विषयावर २०० मार्काची परीक्षा ३ एप्रिल रोजी घेण्यात येईल. सकाळी ११ ते १ या वेळात ही परीक्षा होईल व १४ एप्रिल या जयंती दिनी विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात येईल. या परिक्षेमध्ये प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या विद्यार्थ्याला २५ हजार, द्वितीय क्रमांक १५ हजार व तृतीय क्रमांकासाठी १० हजार रूपयांचे बक्षीस महापालिकेद्वारा देण्यात येईल, असे आयुक्तांनी सांगितले. यावेळी स्थायी समितीचे सभापती विलास इंगोले, काँग्रेसचे पक्षनेते बबलू शेखावत उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Dr. Competition for Babasaheb's birth anniversary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.