डॉक्टरपत्नीचा संशयास्पद मृत्यू, पतीवर आरोप; घातपात की आत्महत्या?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2022 02:58 PM2022-04-20T14:58:35+5:302022-04-20T18:25:29+5:30

डॉ. दिवान यांनीच पत्नीचा घातपात केल्याच्या आरोप नातेवाईकांनी केला आहे.

Dr. Director of Shri Sai Health Care Suspicious death of Pankaj Dewan's wife | डॉक्टरपत्नीचा संशयास्पद मृत्यू, पतीवर आरोप; घातपात की आत्महत्या?

डॉक्टरपत्नीचा संशयास्पद मृत्यू, पतीवर आरोप; घातपात की आत्महत्या?

googlenewsNext

अमरावतीराधानगरस्थित साई हेल्थ केअर ॲन्ड मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. पंकज दिवाण यांच्या पत्नीचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

दिवाण यांच्या राधानगर येथील घर वजा हॉस्पिटलमध्ये बुधवारी सकाळी ९ च्या सुमारास ही घटना उघड झाली. प्रथमदर्शनी त्यांनी आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत असले, तरी मुलीच्या डॉक्टर पतीनेच तिचा घातपात घडवून आणल्याचा आरोप मृताच्या नातेवाइकांनी केल्याने प्रकरण संशयास्पद ठरले आहे. प्रियंका पंकज दिवाण (२८, रा. साई हेल्थ केअर ॲन्ड मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, राधानगर) असे मृताचे नाव आहे.

कुठलेसे इंजेक्शन स्वत:ला टोचून घेत त्यांनी आत्महत्या केली, असा दावा दिवाण कुटुंबीयांकडून करण्यात आला. मात्र, आत्महत्या असेल, तर नेमकी कशी, याबाबत पोलीस प्रशासनाला शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा आहे. इंजेक्शन टोचून घेतले, की कुणी दुसऱ्याने टोचले, यादिशेेने पोलीस तपास करीत असल्याचे पोलिसांनी सांगितले. डॉ. पंकज दिवाण यांचे राधानगरला मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल आहे. हॉस्पिटलच्या वरच्या माळ्यावर दिवाण दाम्पत्य राहतात.

मंगळवारी रात्री १० च्या सुमारास प्रियंका या स्वत:च्या खोलीत झोपी गेल्या. मात्र, बुधवारी त्या उठत नसल्याने कुटुंबीयांनी त्यांना झोपेतून उठविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या बेडरूममध्ये खाली चादरीवर चित्त अवस्थेत आढळल्या. तर त्यांचे अंग निळसर दिसत होते. माहितीनुसार, प्रियंका या डी.फॉर्म. असून, त्या डॉ. पंकज दिवान यांच्या दुसऱ्या पत्नी होत्या. याबाबत सकाळी १० च्या सुमारास गाडगेनगर पोलिसांना माहिती देण्यात आली. मूल होत नसल्याने प्रियंका या डिप्रेशनमध्ये होत्या. त्यांना गोळ्या देखील सुरू होत्या. त्यातून त्यांनी आत्महत्या केली असावी, अशी शक्यता डॉ. दिवाण यांनी वर्तविल्याची माहिती पोलिसांनी दिली.

ऑगस्ट २०१९ मध्ये लग्न

दरम्यान बुधवारी प्रियांकाचा अचानक मृत्यू झाल्याने आई-वडिलांना धक्काच बसला. डी.फॉर्म. केलेली प्रियंका ही सुरुवातीला इर्विनमध्ये इंटर्नशिप करत होती. तेथे डॉ. पंकज दिवाण यांच्याशी तिची ओळख झाली. त्यानंतर कोविडकाळात तिने एका कोविड हॉस्पिटलमध्ये काम केली. नंतर ती डॉ. दिवाण यांच्या हॉस्पिटलला काम करायला लागली. त्यानंतर ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. नंतर २४ ऑगस्ट २०१९ रोजी दोघांनी लग्न केले. लग्नानंतर प्रियंका या राधानगर येथे राहत होते.

Web Title: Dr. Director of Shri Sai Health Care Suspicious death of Pankaj Dewan's wife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.