डॉ. रणजित पाटील डेंग्यूबाबत गंभीर अमरावतीत आज घेणार बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 10:20 PM2018-08-22T22:20:05+5:302018-08-22T22:20:24+5:30

डेंग्यूने अमरावती महानगराला मारलेल्या मगरमिठीची नगरविकास राज्यमंत्री डॉ.रणजित पाटील यांनी गांभीर्याने दखल घेतली आहे. याअनुषंगाने ते गुरूवारी अमरावतीत काही निवडक अधिकाऱ्यांची बैठक घेतील. तत्पूर्वी, ते शहरातील काही रुग्णालयांना भेट देतील.

Dr. Meeting to take up Ranjeet Patil dengue today in Amravati; | डॉ. रणजित पाटील डेंग्यूबाबत गंभीर अमरावतीत आज घेणार बैठक

डॉ. रणजित पाटील डेंग्यूबाबत गंभीर अमरावतीत आज घेणार बैठक

Next
ठळक मुद्देघोषणा करणार !: वाजपेयींच्या अस्थिकलशाचेही दर्शन घेणार

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : डेंग्यूने अमरावती महानगराला मारलेल्या मगरमिठीची नगरविकास राज्यमंत्री डॉ.रणजित पाटील यांनी गांभीर्याने दखल घेतली आहे. याअनुषंगाने ते गुरूवारी अमरावतीत काही निवडक अधिकाऱ्यांची बैठक घेतील. तत्पूर्वी, ते शहरातील काही रुग्णालयांना भेट देतील. नागरिकांच्या वेदनांची आणि आरोग्याची जाण असलेले डॉ. पाटील हे बैठकीनंतर महत्त्वपूर्ण घोषणा करण्याचीही शक्यता आहे.
प्रतिबंध शक्य असतानाही उपाययोजना करण्याऐवजी महापालिकेने केलेल्या लपवाछपवीमुळे अमरावती शहरात डेंग्यूने हाहाकार माजविला. दोन महिन्यांपूर्वी बडनेरा रोड परिसरापुरता मर्यादित असलेला डेंग्यू शहरभर पसरला. आता तो महापालिकेच्याही नियंत्रणाबाहेर गेला आहे. महापालिकेच्या प्रशासकीय असामर्थ्यामुळे चार जणांचे नाहक बळी गेलेत.
सामान्यांच्या वेदना 'लोकमत'ने लोकदरबारात मांडल्यावर आयुक्त बाहेर निघाले. फवारणी, धूरळणी सुरू झाली. अनेक स्वास्थ्य निरीक्षकांना, कंत्राटदारांना दंड ठोठावले. मात्र, डेंग्यू नियंत्रणासाठी त्याचा परिणाम दिसून आला नाही. ही स्थिती निर्माण होऊ देणाºया उच्चपदस्थ अधिकाºयांवर कारवाईची मागणी नागरिकांनी केली; पण आयुक्तांनी तीही दुर्लक्षित केली.
डॉ. रणजित पाटील हे गुरूवारी दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या अस्थिकलशाचेही दर्शन घेतील.

Web Title: Dr. Meeting to take up Ranjeet Patil dengue today in Amravati;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.