डॉ. पंजाबराव देशमुख अर्बन को-अॉप. बँकेचे चेअरमन संजय वानखडे यांची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2017 01:07 AM2017-09-21T01:07:43+5:302017-09-21T01:07:45+5:30
डॉ. पंजाबराव देशमुख अर्बन को-अॉप. बँकेचे चेअरमन संजय वानखडे यांनी आत्महत्या केल्याची घटना बुधवारी रात्री 11 वाजता उघडकीस आली. ते समर्थ कॉलनीत राहत होते.
अमरावती, दि. 21 - डॉ. पंजाबराव देशमुख अर्बन को-अॉप. बँकेचे चेअरमन संजय वानखडे यांनी आत्महत्या केल्याची घटना बुधवारी रात्री 11 वाजता उघडकीस आली. ते समर्थ कॉलनीत राहत होते. माहिती मिळताच राजापेठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर सूर्यवंशी व वाहतूक शाखेचे अर्जुन ठोसरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता वानखडे यांचा मृतदेह दिलीप ठाकरे यांच्या घरात गळफास घेऊन लटकलेले दिसले. दिलीप ठाकरे हे संजय वानखडे यांचे नातेवाईक असून त्यांच्या घराची चावी वानखडे यांच्याकडेच होती. कारण दिलीप ठाकरे हे नुकतेच सेवानिवृत्त झाले असल्याने ते पुण्यात राहत होते. नातेवाईकांनी मृतदेहाची ओळख पटविली आहे. ते वृत्त लिहिल्यावर पोलीस घटनास्थळी पोहोचले होते. कार्यवाही सुरू होती. संजय वानखडे यांचे बंधू दिलीप वानखडे यांनी राजापेठ ठाण्यात संजय वानखडे बेपत्ता झाल्याचे तोंडी कळविण्याचे माहिती रा. पोलिसांना ना मिळाली आहे. संजय वानखडे हे एकटेच होते. विना लग्नाचे होते.