रिद्धपूर येेथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी रक्तदान शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:12 AM2021-04-16T04:12:07+5:302021-04-16T04:12:07+5:30
रिद्धपूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून सिद्धार्थ युवक मंडळामार्फत शहीद सुभेदार एन.के. खोब्रागडे स्मारक, वाचनालय ...
रिद्धपूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून सिद्धार्थ युवक मंडळामार्फत शहीद सुभेदार एन.के. खोब्रागडे स्मारक, वाचनालय व अभ्यासिका केंद्र येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष दत्ता ढोमणे होते. प्रमुख पाहुणे शिरखेड पोलीस ठाण्याचे कर्मचारी किसन धुर्वे, सरपंच गोपाल जामठे, उपसरपंच अब्दुल साबीर, सुनील गवळी, राजेंद्र बिडकर, सदाशिव वानखडे, दत्ता भेले, इंगळे, तात्यासाहेब मेश्राम, प्रवीण जावरकर, सचिन डवके उपस्थित होते. प्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व शहीद सुभेदार एन.के. खोब्रागडे विजयस्तंभाला मानवंदना देण्यात आली. एकूण ५४ रक्तदात्यांनी रक्तदान केले. जिल्हा सामान्य रुग्णालयाचे डॉ. शार, डॉ. आगरकर, डॉ. गायधने, डॉ. हजारे, डॉ. मंगेश उमप यांनी रक्तसंकलन केले. शिबिराला आ. देवेंद्र भुयार यांनी भेट दिली.
सिद्धार्थ युवक मंडळाचे मनीष शेंडे, युवराज वंजारी, संदीप रामटेके, अरविंद शिंगाडे, मनोज वानखडे, पंकज हरणे, प्रदीप पंजाबी, दिलीप घोडेस्वार, रणजित सिनकर, बाळू लासूरकर, पवन इंगळे, प्रज्वल बनसोड, धीरज तागडे, अक्षय खोब्रागडे, हेमंत तागडे, प्रवीण गजभिये, अमर गजभिये, आशिष खोब्रागडे, कार्तिक खोब्रागडे, निखिल गजभिये, विकास गेडाम, रोहित अवसरमोल, नयन गजभिये, अंकुश गव्हांदे, तेजस शेंडे, आतिष गव्हांदे, रोशन शेंडे, पवन बागडे, अमोल गव्हांदे, तुषार बोरकर, पूनम रामटेके आदींनी परिश्रम घेतले.