अजगराने केली बकरीची शिकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2020 05:00 AM2020-07-05T05:00:00+5:302020-07-05T05:01:05+5:30
गुगामल वन्यजीव विभागांतर्गत येत असलेल्या हरिसाल परिक्षेत्राच्या दक्षिण चौराकुंड ५९६ क्रमांकाच्या बीट जंगलात अजगराने बकरीची शिकार केली. तिच्या ओरडण्याने परिसरातील आदिवासी घटनास्थळी जमा झाले होते. वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण आणि वनकर्मचारीसुद्धा तात्काळ घटनास्थळी पोहोचले. अजगराला संपूर्ण बकरी फस्त करेपर्यंत त्याचे संरक्षण वनकर्मचाऱ्यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
चिखलदरा : मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या गुगामल वन्यजीव विभाग अंतर्गत येणाऱ्या हरिसाल परिक्षेत्रातील जंगलात अजगराने शेळीची शिकार केल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघड झाली.
गुगामल वन्यजीव विभागांतर्गत येत असलेल्या हरिसाल परिक्षेत्राच्या दक्षिण चौराकुंड ५९६ क्रमांकाच्या बीट जंगलात अजगराने बकरीची शिकार केली. तिच्या ओरडण्याने परिसरातील आदिवासी घटनास्थळी जमा झाले होते. वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण आणि वनकर्मचारीसुद्धा तात्काळ घटनास्थळी पोहोचले. अजगराला संपूर्ण बकरी फस्त करेपर्यंत त्याचे संरक्षण वनकर्मचाऱ्यांनी केले.
मेळघाटच्या जंगलात विविध वन्यजीव आणि जंगली श्वापदांचा मुक्त संचार आहे. शेळीला अजगराने वेढा मारताच तिने ओरडण्यास सुरुवात केली. परिसरात अस्वल असल्याची अफवा पसरली होती. मात्र, वन्यजीव विभागाच्यावतीने ती बकरी असल्याचे स्पष्ट केले.
चौराकुंड बीटमधील ५९६ कंपार्टमेंट नंबरमध्ये सहा महिन्याच्या बकरीच्या पिलाची अजगराने शिकार केली. वनकर्मचारी, चौकीदार पूर्ण शिकार होईस्तोवर तैनात ठेवण्यात आले होते.
- दीपाली चव्हाण,
वनपरिक्षेत्राधिकारी हरिसाल